शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! सोलापुरातील ‘या’ १३४ शाळांचा थांबणार पगार; रिक्त, अतिरिक्त शिक्षकांची दिली नाही माहिती

सर्व अतिरिक्त शिक्षकांचे २६ जानेवारीपूर्वी दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे शिक्षण विभागाकडून नियोजन सुरू आहे. मात्र, १३४ शाळांनी त्यांच्याकडील रिक्त, अतिरिक्त शिक्षकांची माहिती न दिल्याने या शाळांची पगार थांबविली जाणार आहे.
sakal exclusive
sakal exclusivesakal
Updated on

सोलापूर : पटसंख्या कमी झाल्याने शहरातील ३३० शाळांपैकी जवळपास ८७ शाळांमधील १०८ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यात बिगर अल्पसंख्यांक शाळांमधील ६२ तर अल्पसंख्यांक शाळांमधील ४६ शिक्षक आहेत. या सर्व अतिरिक्त शिक्षकांचे २६ जानेवारीपूर्वी दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे शिक्षण विभागाकडून नियोजन सुरू आहे. मात्र, १३४ शाळांनी त्यांच्याकडील रिक्त, अतिरिक्त शिक्षकांची माहिती न दिल्याने या शाळांची पगार थांबविली जाणार आहे.

मागील तीन- चार वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी, उर्दु, कन्नड माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या कमी होऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही मराठी व समाजशास्त्र विषयांचे शिक्षक अतिरिक्त झाले असून त्यांच्याही समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दरम्यान, खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील दुसऱ्या खासगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश आहेत. मात्र, अनेक शाळा अशा अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करून घेत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे.

अतिरिक्त झालेल्या शिक्षकांनाही जवळचीच शाळा हवी असते. अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करून न घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना आहे, मात्र तो अधिकार कागदावरच राहतो. त्यामुळे त्या शिक्षकांना महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजित केले जाते. आता खासगी शाळा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला तयार होतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

काही शाळांची संचमान्यताच अपूर्ण

शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांची ‘युडायस-प्लस’वर ऑनलाइन माहिती भरणे बंधनकारक केले आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नव्हते तर काहींचे मिळाले नव्हते. त्या आधार अपडेशनमुळे अनेक शाळांची पदे संचमान्यतेत कमी आली होती. आता अपडेशन पूर्ण झाल्यानंतर काही शाळांनी संचमान्यता दुरूस्तीसाठी उपसंचालक कार्यालयास पाठविली आहे. त्यामुळे काही शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिलेली नाही. त्यांच्याकडील माहिती आल्यावर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया होणार आहे.

पगार थांबविण्यासंदर्भातील पत्र मुख्याध्यापकांना

खासगी प्राथमिक शाळा व अल्पसंख्यांक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन २६ जानेवारीपर्यंत होणार आहे. त्यासाठी ३३० शाळांमधील रिक्त, अतिरिक्त व कार्यरत शिक्षकांची माहिती मागविली आहे. ज्या शाळा मुदतीत माहिती देणार नाहीत, त्या शाळांचा पगार थांबविण्यासंदर्भातील पत्र मुख्याध्यापकांना दिले आहे.

- संजय जावीर, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()