दहावीचा निकाल जुलैमध्ये तर ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल

Results
Results
Updated on
Summary

दहावीचा निकाल जुलैमध्ये तर बारावीचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे. तर अकरावी प्रवेशासाठी जुलैअखेरीस 'सीईटी' घेतली जाणार आहे. आता निकाल तयार करताना गुणांची टक्‍केवारी वाढण्यासाठी शाळांचा खटाटोप सुरू आहे.

सोलापूर : दहावीची परीक्षा रद्द झाल्याने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. परंतु, शाळेच्या निकालाची टक्‍केवारी वाढावी, स्पर्धेतील शाळांच्या तुलनेत आपली पटसंख्या कमी होऊ नये, याची खबरदारी घेत बहुतेक शाळांनी आता बोर्डाच्या परीक्षेपूर्वी झालेल्या पूर्व परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांची पुन्हा पूर्व परीक्षा घेणे सुरू केले आहे. (The results of class SSC will be announced in July and the results of class HSC in August)

Results
CBSE दहावीचा निकाल पुढे ढकलला; 'ही' आहे नवी तारीख

दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना नववीच्या गुणांवरून 50 टक्‍के तर तोंडी परीक्षेतून 20 टक्‍के आणि पूर्व परीक्षा, लेखी परीक्षेतील गुणांवरून 30 टक्‍के गुण देण्याचे धोरण ठरले. त्यानुसार नववीच्या परीक्षेतील गुणात फेरफार करणे कठीण आहे. त्यामुळे तोंडी परीक्षेत बहुतेक विद्यार्थ्यांना 20 पैकी सरासरी 18 ते 20 गुण तर लेखी परीक्षेतील 30 गुणांपैकी 25 ते 28 गुण विद्यार्थ्यांना मिळावेत म्हणून शाळांनी आता खटाटोप सुरू केला आहे.

Results
'एमपीएससी'च्या परीक्षांचा बदलणार निकाल

बोर्डाच्या परीक्षेपूर्वी दहावी-बारावीच्या वर्गासाठी परवानगी दिली होती. त्यावेळी शाळांनी त्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा घेतली. मात्र, अभ्यासात हुशार नसलेल्यांना संबंधित विषय शिक्षकांनी जेवढी उत्तरे लिहिली, तेवढेच गुण दिले. त्यानुसार गुण ग्राह्य धरल्यास विद्यार्थ्यांच्या टक्‍केवारीवर परिणाम होईल म्हणून मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार सर्वच विषय शिक्षकांनी तशा विद्यार्थ्यांचा शोध घेतला आहे. त्यांची पुन्हा पूर्व परीक्षा घेण्याचे काम हाती घेतले असून शिक्षकांना टप्प्याटप्याने शाळेत बोलावून हे काम करून घेतले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकाराची पडताळणी करून ते सिध्द करणे कठीण असल्याने असे प्रकार सुरू असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठांनी सांगितले.

Results
आरक्षणामुळे "एमपीएससी'च्या 24 परीक्षांचा तिढा ! संयुक्‍त पूर्वपरीक्षा लांबणार

बारावीच्या मूल्यमापनाचा पेच

मागच्या वर्षी अकरावीची परीक्षा ऑनलाइन पार झाली. तर दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द झाल्याने अन्य विषयांच्या गुणांच्या सरासरीतून त्या विषयाला गुण दिले गेले. आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना त्यांच्यासाठी दहावी की अकरावीच्या गुणांचा आधार घ्यावा, या पेचात शालेय शिक्षण विभाग सापडले आहे. तरीही, दहावीच्या टक्‍केवारीतील 50 टक्‍के गुण आणि बारावीतील अंतर्गत व लेखी अथवा प्रात्यक्षिक चाचणीचे 50 टक्‍के गुण, असा फॉर्म्युला असेल, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. तर राज्यातील जवळपास 22 हजार शाळांकडून दहावीतील 16 लाख विद्यार्थ्यांचे ठरल्याप्रमाणे गुण जूनअखेर बोर्डाकडे पाठविणे अपेक्षित आहे. साधारणपणे जुलैमध्ये दहावीचा निकाल जाहीर होईल. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांची जुलैअखेर 'सीईटी' परीक्षा घेऊन ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन परीक्षा परिषदेने सुरू केले आहे.

Results
"एसईबीसी'च्या जागांवर अडकला पूर्व परीक्षांचा निकाल ! "एमपीएससी'ने मागितले सरकारकडून मार्गदर्शन 

दहावीचा निकाल जुलैपर्यंत जाहीर होईल, असे नियोजन सुरू आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शासनाने दिलेल्या आदेशानुसार व्हावे. शाळांनी त्यात काही फेरफार केल्यास निश्‍चितपणे कारवाई होईल.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, पुणे बोर्ड

(The results of class SSC will be announced in July and the results of class HSC in August)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.