'राज्यसेवा पूर्व'चा निकाल तयार ! जागा वाढीबद्दल मंगळवारी निर्णय

"राज्यसेवा पूर्व'चा निकाल तयार ! राज्यमंत्री म्हणाले, जागा वाढीबद्दल मंगळवारी निर्णय
mpsc
mpscEsakal
Updated on
Summary

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांची नियुक्‍ती झाल्यानंतर आता इच्छुकांना अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत.

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) तीन सदस्यांची नियुक्‍ती झाल्यानंतर आता इच्छुकांना अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. 29 ऑगस्ट रोजी आयोगाचे विद्यमान अध्यक्ष सतीश गवई (Satish Gawai) हे सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नूतन सदस्य राजीव जाधव (Rajiv Jadhav) यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे, नोव्हेंबरमध्ये राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) हे सेवानिवृत्त होत असल्याने आयोगाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचीही चर्चा सुरू आहे.

mpsc
'सीआरपीएफ'मध्ये 2439 पॅरामेडिकल स्टाफची होणार भरती !

जून 2018 पासून रिक्‍त असलेल्या "एमपीएससी'च्या चार सदस्यांपैकी तीन जणांची निवड झाली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मंत्र्यांजवळ काम केलेल्या अधिकाऱ्यांची आतापर्यंत अशा संवैधानिक पदावर नियुक्‍ती झाल्याची उदाहरणे नाहीत. तरीही, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे "ओएसडी' राजीव जाधव यांना त्या ठिकाणी संधी मिळाली. तिन्ही पक्षांनी त्यांच्या फेव्हरमधील मराठा समाजातील सदस्यांची नियुक्‍ती केल्याचा विरोधकांमध्ये सूर आहे. दुसरीकडे, ऑगस्टअखेरीस आयोगाचे अध्यक्ष गवई तर नोव्हेंबरमध्ये सदस्य दयानंद मेश्राम हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाला आणखी तीन सदस्यांची नियुक्‍ती करावी लागेल. 2019 मधील नियमावलीनुसार आपत्कालीन परिस्थितीत प्राप्त अर्जातून सदस्यांची निवड अपेक्षित आहे. परंतु, अध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागवावे लागतील. त्यामुळे गवई हे सेवानिवृत्त झाल्यानंतर अध्यक्षपदी जाधव यांनाच संधी मिळेल, असे बोलले जात आहे. मात्र, कुंटे यांना सेवानिवृत्तीनंतरही प्रशासनात ठेवायचे असल्यास प्रभारी अध्यक्षांवरच आयोगाचे कामकाज चालविले जाऊ शकते. कुंटे यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागेल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे गवई यांच्या सेवानिवृत्तीनंतर आयोगातील होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

mpsc
युनियन बॅंकेत व्यवस्थापक पदांसाठी भरती! 3 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

राज्यसेवा "पूर्व'च्या निकालाचा अडथळा दूर

मार्च 2021 मध्ये झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल तयार झाला आहे. परीक्षेतील एका प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे असल्यावरून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती. ही याचिका न्यायालयाने गुरुवारी (ता. 12) निकाली काढली आहे. त्यामुळे रखडलेला निकाल आता जाहीर करण्याच्या दृष्टीने आयोगाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात निकाल जाहीर होणार असून, तोवर सामान्य प्रशासन विभागाकडून वाढीव जागांसंदर्भात मागणीपत्र प्राप्त होणे अपेक्षित आहे. शासकीय सेवेतील रिक्‍त पदांची संख्या वाढल्याने रिक्‍त पदांचे मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाने हाती घेतली आहे. निकालापूर्वी मागणीपत्र आल्यास राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या निकालात फेरबदल करण्याची आयोगाने तयारी दर्शविली आहे.

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या मागे निश्‍चितपणे आम्ही आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, निकालापूर्वी जागा वाढविण्यासंदर्भात मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल. निश्‍चितपणे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नियोजन होईल.

- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.