14 जूनपासून ऑनलाइन शाळा ! शालेय शिक्षण विभागाची सावध भूमिका

शाळा ऑनलाइन सुरू करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे
Online School
Online SchoolCanva
Updated on
Summary

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज आणि तोंडावर आलेला पावसाळा, या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

सोलापूर : राज्यातील जवळपास एक लाख शाळांमध्ये (पहिली ते बारावी) दोन कोटी तीन लाख 34 हजार 521 मुले आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Covid-19) ओसरत असतानाच ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आली असून त्याचा सर्वाधिक धोका बालकांना आहे, असाही अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते बारावीचे ऑनलाइन वर्ग (Online Class) 14 जूनपासून सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) केले आहे. (The school education department is preparing to start the school online)

Online School
ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी आता ग्रामस्तरीय समित्या !

बारावी परीक्षेचा निर्णय अजून झाला नसून दहावीच्या परीक्षेचा निर्णयही प्रलंबितच आहे. परंतु, अन्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज आणि तोंडावर आलेला पावसाळा, या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मागील वर्षी शाळा बंद राहिल्याने आता सुरवातीपासूनच उपचारात्मक अध्यापनावर भर दिला जाणार आहे. त्यासंबंधीचा कृती आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केला असून शिक्षण विभागाकडून तसे निर्देश शाळांना दिले जाणार आहेत. तत्पूर्वी, 13 जूननंतर शिक्षकांची सुटी संपताच शाळांनी 14 जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची तयारी ठेवावी, शिक्षकांना तशा सूचना द्याव्यात, अशा सूचना दिल्याचे सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी सांगितले. दरम्यान, काही महाविद्यालयांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत चाचणी घेऊन 1 जूनपासून बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करीत विद्यार्थ्यांना तसे मेसेज दिले आहेत.

Online School
पुढील दोन वर्षांत टेलिकॉम क्षेत्रात होणार बंपर भरती !

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नियोजन केले आहे. साधारणपणे 14 जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू होतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोरोनाची परिस्थिती पाहून दोन-तीन महिन्यात ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.

- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्‍त, मुंबई

शाळा अन्‌ विद्यार्थ्यांची स्थिती

  • पहिली ते आठवीच्या शाळा : 70,812

  • विद्यार्थ्यांची संख्या : 1,46,86,493

  • नववी ते बारावीच्या शाळा : 22,204

  • विद्यार्थ्यांची संख्या : 56,48,028

  • दिवाळीनंतर ऑफलाइन वर्ग

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला होता. ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड वेळेत न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. आता तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याने शालेय शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेत ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे. ऑगस्ट- सप्टेंबरनंतर म्हणजेच साधारणपणे दिवाळीनंतर ऑफलाइन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()