Aditya Thackeray: साप तेजसला बड्डे विश करायला आला! मातोश्रीमधल्या सापावरून आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

'ठाकरे कितीही विषारी बोलत असले तरी त्यांच्या घरी साप कोणी सोडू नये', शेलारांचा टोला
Aaditya Thackeray
Aaditya ThackerayEsakal
Updated on

Mumbai Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' बंगल्यामध्ये काल (रविवारी) कोब्रा जातीची विषारी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. सर्पमित्रांना बोलावून अखेर सापाला पकडण्यात आलं. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. त्याची लांबी अंदाजे ४ फूट इतकी होती.

यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरे कितीही विषारी बोलत असले तरी त्यांच्या घरी असे साप कोणी सोडू नये," अशी खिल्ली शेलारांनी उडवली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Aaditya Thackeray
Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याच्या आवारात आढळला 'कोब्रा' जातीचा विषारी साप

आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, 'सापाचं बोलायचं झालं तर साप बाजूच्या बंगल्यात सापडला. आज तेजसचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा द्यायला आला असेल, तेजस सर्पमित्र आहे. साप हा विष रिफिल करायला भाजप कार्यालयात जात असेल, इथे बड्डे विश करायला आला असेल असंही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

Aaditya Thackeray
Accident News: फोंडा-पणजी महामार्गावर मर्सिडीजमुळे भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

"मातोश्री" बंगल्यात काल (रविवारी) कोब्रा जातीचा विषारी नाग आढळला. वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोसिएशनला फोन करुन साप आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून सापाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले. त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती.

Aaditya Thackeray
Rahul Gandhi Breaking: अखेर खासदारकी बहाल! उद्या मोदी-राहुल गांधी आमनेसामने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()