15 जुलैनंतर शिथिल होणार निर्बंध ! मुंबई लोकलसंदर्भात सावध भूमिका

15 जुलैनंतर शिथिल होणार निर्बंध ! मुंबई लोकलसंदर्भात सावध भूमिका
Unlock
Unlock esakal
Updated on

15 जुलैपूर्वी राज्यातील प्रादुर्भावाचा आढावा घेऊन निर्बंध शिथिलतेचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे (Delta Plus variant) राज्य सरकारने 23 जिल्हे तिसऱ्या टप्प्यात गणले. सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत दुकानांना परवानगी दिली असून शनिवार, रविवारी अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निघाले. या आदेशाने पुन्हा लहान-मोठ्या व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढल्या तर राज्याची आर्थिक स्थितीसुद्धा बिकट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता 15 जुलैनंतर राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून निर्बंध शिथिलतेचा (Lockdown) निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील (Disaster Management) वरिष्ठ सूत्रांनी दिली. (The state will decide on the lockdown after July 15 as the incidence of corona virus is declining)

Unlock
शिवाजी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. यादव यांची फेरनिवड !

राज्यातील जवळपास 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंटची (Chartered Accountant) परीक्षा ऑफलाइन पद्धतीने देता येणार आहे. राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केल्याने रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दोन-तीन तासांच्या प्रवासाला पाच तासांहून अधिक काळ लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर परीक्षार्थींनी मुंबई लोकलमधून प्रवेश करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या मागणीवर सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला असून डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचाही प्रादुर्भाव आटोक्‍यात येण्यास नव्या निर्बंधाची मदत झाली आहे. 15 जुलैपूर्वी राज्यातील प्रादुर्भावाचा आढावा घेऊन निर्बंध शिथिलतेचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Unlock
प्रदर्शनापूर्वीच "फिरस्त्या'चे अकरा देशांत कौतुक अन्‌ 53 पुरस्कार !

निर्बंध शिथिलतेच्या आदेशावर माहिती अधिकार

सोलापूर शहराबाबत स्वतंत्र आदेश काढताना रात्री साडेनऊच्या सुमारास सचिवालय उघडून अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली. त्यासंदर्भात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रयत्न केल्यासंदर्भात माहिती माध्यमांना देण्यात आली. त्यासंदर्भात एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती अधिकारातून माहिती मागविल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ठळक बाबी...

  • डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लागू केलेले नवे निर्बंध 15 जुलैनंतर होणार टप्प्या-टप्प्याने शिथिल

  • सप्टेंबरमध्ये कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भात घेतला जाईल निर्णय

  • राज्यभर 5 ते 22 जुलै या काळात होणार चार्टर्ड अकाउंटंटची ऑफलाइन परीक्षा

  • परीक्षेला वाहतूक कोंडीमुळे विलंब होऊ शकतो; मुंबई लोकल सुरू करण्याची मागणी

  • आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली सावध भूमिका; कोरोनाची परिस्थिती सावरू लागली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.