मुख्य मागणी मान्य केलीच नाही! एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

मुख्य मागणी मान्य केलीच नाही! एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
st strike
st strikeSakal
Updated on
Summary

मुख्य मागणीवर अद्याप कुठलाही विचार न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवलं आहे.

सोलापूर : एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी घेऊन राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. यादरम्यान राज्यातील बऱ्याच ठिकाणी एसटी बस (State Transport) आगारामध्येच थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी मान्य केली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला समावेश राज्य सरकारमध्ये करून घ्यावा, अशी मागणी केली होती. हीच आपली मुख्य मागणी असल्याचं आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं. या मागणीवर मात्र अद्याप कुठलाही विचार न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही आंदोलन (Agitation) सुरूच ठेवलं.

st strike
अहमदनगर : पोलिस ठाण्याच्या आवारात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

अहमदनगरमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बंद पुकारला होता. त्याबाबत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर काल रात्री संप मागे घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी आज शुक्रवारी सकाळी अहमदनगरमध्ये एका एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेवगाव मधील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप काकडे यांनी डेपोत उभा असलेल्या बसच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात ते सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणासुद्धा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी चालकाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आतापर्यंत 19 महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात बहुतांश आत्महत्या या आर्थिक विवंचनेतून झाल्या आहेत.

नागपूरमध्ये कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगरमधील दिलीप काकडे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नागपुरातील गणेशपेठ डेपोमध्येही चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. कमलेश ठाकरे असे चालकाचे नाव आहे. कमलेश ठाकरे यांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आली. त्यांनी झाडाकडे धाव घेत कर्मचारी ठाकरेला खाली उतरवले. यामुळे पुढील अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

st strike
नागपूर : एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर आगारात संप पुन्हा सुरू

काल संप संपल्यानंतर आज अहमदनगरमधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर आगारात कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलाय. या वेळी कर्मचाऱ्यांनी काल कृती समितीने घेतलेल्या भूमिकेला सोलापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली व आज जिथे जिथे एसटी कर्मचारी आंदोलन करताहेत तिथल्या आंदोलनात आज भाजप सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. या वेळी आंदोलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जालना, औरंगाबादमध्येही संप सुरू

जालन्यात एसटी कामगारांचे आंदोलन चिघळले. भाजप युवा मोर्चाने आंदोलनात उडी घेतली. कर्मचाऱ्यांनी अंबड डेपोला टाळे ठोकले. कृती समितीने विलगीकरणाचा मुद्दा सरकारसमोर मांडला नसल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चा आणि चालक आणि वाहक यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.

औरंगाबादमध्ये संयुक्त कृती समितीचा काल घेण्यात आलेला निर्णय सर्वसामान्य एमटी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. कारण सर्व एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही राज्य परिवहन हे राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची होती. परंतु संयुक्त कृती समितीने कामगारांना अंधारात ठेवून भ्रमनिराश केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे औरंगाबादेत आंदोलन सुरूच, राहील असे जाहीर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()