TET Exam 2023: आचारसंहितेमुळे थांबली भावी शिक्षकांची ‘टेट’! १० हजार केंद्रांवर फेब्रुवारीअखेरीस परीक्षा

परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.
exam
exam esakal
Updated on

सोलापूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे.

पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.

पहिली ते बारावीच्या वर्गांव शिक्षक होण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक क्षमता व अभियोग्यता चाचणी (टेट) उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे.

जिल्हा परिषद असो वा खासगी अनुदानित शाळांवरील नवीन शिक्षकांना त्याशिवाय मान्यताच दिली जात नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा आता फेब्रुवारीअखेरीस घेतली जाणार आहे.

२५ मार्चपर्यंत परीक्षा संपवून एप्रिल-मे महिन्यात शिक्षक भरतीला सुरवात केली जाणार आहे. खासगी शाळांना एका पदासाठी दहा जणांना (टेट) बोलावून त्यांच्या मुलाखतीतून शिक्षक भरती करावी लागणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवरील शिक्षक भरती मेरिटनुसार होणार आहे.

मात्र, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण व अमरावतीतील शिक्षक व पदवीधर आमदारकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी होणाऱ्या ‘टेट’चे नियोजन १५ दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.

रीपण, मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होऊन मार्चअखेरीस संपेल आणि त्यानंतर काही दिवसांतच निकाल जाहीर होणार आहे.

जेईई-सीईटीच्या धर्तीवर परीक्षा

‘टेट’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असून जेईई व सीईटीच्या धर्तीवर ‘टेट’ घेतली जाणार आहे. साधारणत: साडेतीन लाख परीक्षार्थी ही परीक्षा देतील असा अंदाज असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. दररोज आणि तीन सत्रातील पेपरसाठी प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असणार आहेत.

दररोज तीन सत्रात होतील पेपर

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ‘आयपीबीएस’ व ‘टीसीएस’ या कंपन्यांकडील जवळपास दहा हजार केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन पार पडेल. परीक्षा केद्रांची यापूर्वीच निश्चिती झाली असून दररोज तीन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे.

वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका असेल आणि पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना दोन तासांचा वेळ मिळेल. दररोज साधारणत: २५ ते ३५ हजार विद्यार्थी देतील, अशी व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पेरीक्षेची केंद्रे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.