पोलिसांना गाडीची चावी काढून घेण्याचा नाही अधिकार! वाहन चालकाचे अधिकार काय, कोठे दाद मागायची, जाणून घ्या

भारतीय मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये पोलिस कर्मचाऱ्याला वाहन तपासणीदरम्यान वाहनाची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही. मात्र, तपासणीवेळी वाहन चालक किंवा मालकाला परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) दाखवायला सांगितल्यास तो दाखवावाच लागेल.
traffic police
traffic policesakal
Updated on

सोलापूर : भारतीय मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये पोलिस कर्मचाऱ्याला वाहन तपासणीदरम्यान वाहनाची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही. मात्र, तपासणीवेळी वाहन चालक किंवा मालकाला परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) दाखवायला सांगितल्यास तो दाखवावाच लागेल. गाडीची चावी काढून घेण्याचा, अटक करण्याचा किंवा वाहन जप्तीचा अधिकार वाहतूक हवालदाराला नसतो. नुकताच मुंबई सत्र न्यायालयाने त्यासंबंधीचा निकाल दिला आहे.

भारतीय मोटार वाहन कायदा १९३२अंतर्गत असिस्टंट सब- इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारीच रहदारीच्या उल्लंघनासाठी चालान कापू शकतो. एएसआय, एसआय, निरीक्षकांना स्पॉट फाइन करण्याचे अधिकार आहेत. त्यांच्या मदतीसाठी वाहतूक हवालदार असतात. गाडीच्या चाव्या काढण्याचा व गाडीच्या टायरची हवा काढण्याचाही अधिकार त्यांना नाही. ट्रॅफिक पोलिस विनाकारण त्रास देत असल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.

परंतु, चालकांनी चूक केल्यास त्यांनी पोलिसांना सहकार्य करून दंड भरून घ्यावा. मोटार वाहन कायदा १९८८मधील कलम ३, ४ अंतर्गत सर्व चालकांकडे चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. कलम १८३, १८४ आणि १८५ अंतर्गत वाहनाची वेगमर्यादा योग्य असायला हवी. तसेच मद्यपान करून वाहन चालवू शकत नाही. त्या चुकांसाठी कायद्यातील कलमांतर्गत दंड आकारला जातो. त्यामुळे वाहन चालवताना कोणतीही चूक करू नका, केल्यास दंड भरून त्याची पावती घ्यावी.

‘हे’ कागदपत्रे नेहमीच जवळ ठेवा

वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेटची ओरिजिनल कॉपी) जवळ असावे. तसेच वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) आणि इन्शुरन्सची फोटोकॉपी देखील चालते. एखादी चूक झाली किंवा रहदारीचा एखादा नियम मोडला आणि चालान भरण्यासाठी पैसे नसल्यास अशा परिस्थितीत न्यायालय चालान जारी करते. मात्र, ते न्यायालयात जाऊन भरावे लागेल. या काळात वाहतूक पोलिस अधिकारी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवू शकतात. ते तुम्हाला चालान भरल्यानंतर घेऊन जाऊ शकता.

‘या’ महत्त्वपूर्ण बाबी लक्षात असू द्या

  • - चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक किंवा ई-चलान मशिन असायला हवी. या दोन्हीपैकी एकही गोष्ट पोलिसांकडे नसल्यास तुमच्याकडून दंड वसूल करू शकत नाहीत.

  • - वाहतूक पोलिस त्यांच्या अधिकृत गणवेशात (युनिफॉर्म) असायला हवा. त्याच्या युनिफॉर्मवर बकल नंबर आणि त्याचे नाव असायला हवे. जर तो पोलिस गणवेशात नसल्यास तुम्ही त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवायला सांगू शकता.

  • - वाहतूक पोलिसांचा हेड कॉन्स्टेबल तुमच्याकडून केवळ १०० रुपये इतकाच दंड आकारू शकतात. यापेक्षा जास्त दंड केवळ वाहतूक अधिकारी (ट्रॅफिक ऑफिसर) म्हणजेच एएसआय किंवा एसआय आकारू शकतात.

  • - ट्रॅफिक कॉन्स्टेबल जर तुमच्या गाडीची चावी काढून घेत असल्यास तुम्ही त्या घटनेचा व्हिडिओ बनवू शकता. हा व्हिडिओ त्या भागातील पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार दाखल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.