मुंबई : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांमधील वीज कामगारांना मूळ वेतनात १९ टक्के; तर भत्त्यांमध्ये २५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच जाहीर करण्यात आला.
त्याला काही संघटनांचा पाठिंबा असला, तरी नऊ संघटनांनी यंत्रचालक, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांवर अन्याय झाल्याचे सांगत वेतन करारावर सह्या करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वेतन कराराचा मुद्दा चिघळणार असल्याचे दिसत आहे.
ऊर्जा विभागाने वीज कामगारांना १९ टक्के मूळ वेतनात वाढ देण्यचे जाहीर केले. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांचे मूळ वेतन जास्त असल्याने त्यांना मोठी वाढ मिळेल. मात्र यंत्रचालक आणि तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन कमी असल्याने त्यांना फारसा लाभ मिळणार नाही.
हा वेतन करार हा कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनसह (इंटक) नऊ संघटनांनी करारावर सह्या करण्यास नकार दिल्याची माहिती इंटकचे उपाध्यक्ष राकेश जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.