पोलिस पाटलांमुळे पोलिसांचे काम हलके! उकाड्यामुळे उघडे ठेवलेल्या घरांवर चोरट्यांचा डोळा; निवडणूक बंदोबस्तामुळे पोलिसांना रात्रगस्त अशक्य, काय म्हणतात पोलिस...

उकाड्यामुळे अनेकजण रात्री झोपताना घर उघडे ठेवतात. चोरट्यांकडून त्या घरांना लक्ष्य केले जात आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असून सध्या निवडणुकीच्या बंदोबस्तामुळे देखील गावोगावच्या रात्रगस्तीसाठी पोलिसांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे पोलिस पाटलांच्या माध्यमातून गावागावात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
sakal
robberyesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून उकाड्यामुळे अनेकजण रात्री झोपताना घर उघडे ठेवतात. याच संधीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांकडून त्या घरांना लक्ष्य केले जात असल्याची स्थिती आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असून सध्या निवडणुकीच्या बंदोबस्तामुळे देखील गावोगावच्या रात्रगस्तीसाठी पोलिसांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे पोलिस पाटलांच्या माध्यमातून गावागावात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

गतवर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा उकाडा वाढत असून काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. गावागावातील अनेक कुटुंब दरवाजा उघडा ठेवून झोपतात. अशा घरांवर पाळत ठेवून चोरट्यांकडून त्याठिकाणी चोरी, घरफोडी केली जात असल्याची स्थिती आहे. चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढत असताना देखील अनेकजण घरात मौल्यवान वस्तू ठेवत आहेत. मोठी रोकड देखील घरात ठेवतात असे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बॅंकेत किंवा लॉकरमध्ये ठेवावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांना सध्या मनुष्यबळाअभावी गावागावात रात्रगस्त अशक्य असल्याने पोलिस पाटलांच्या माध्यमातून नागरिकांना सावध केले जात आहे. पोलिस पाटील सध्या पोलिसांच्या कामाचा भार हलका करीत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका

उन्हाळ्यातील उकाड्यामुळे अनेकजण घर उघडे ठेवून झोपतात. काहीजण टेरेसवर झोपतात आणि त्या संधीचा फायदा घेऊन ग्रामीणमध्ये घरफोडी, चोरी वाढते. सध्या निवडणूक व बंदोबस्तामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोलिसांची रात्रगस्त शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घर उघडे ठेवू नये, घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

-----------------------------------------------------------------------------------------

क्युआर कोड पद्धतीने रात्रगस्त सुरु आहे

सोलापूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड पेट्रोलिंग व संपूर्ण शहरात रात्रगस्त सुरूच आहे. आपल्या परिसरात काही संशयास्पद वाटल्यास नागरिकांनी जवळील पोलिस ठाण्यास किंवा डायल ११२ वर संपर्क करावा. दुसरीकडे नागरिकांनी परगावी जाताना किंवा घरात शक्यतो कामाशिवाय मौल्यवान वस्तू व रोकड ठेवू नये.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

मनुष्यबळ कमी अन्‌ बंदोबस्तामुळे रात्रगस्त अशक्य

शहर व ग्रामीण पोलिसांकडे सद्य:स्थितीत लोकसंख्या व जिल्ह्याच्या विस्ताराच्या प्रमाणात मनुष्यबळ कमीच आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास साडेअकराशे गावे असून पोलिसांचे मनुष्यबळ केवळ अडीच हजारांपर्यंतच आहे. शहरात देखील पोलिसांचे मनुष्यबळ कमीच असून शहरातील पोलिसांना वर्षातील ३६५ पैकी २३० दिवस तर बंदोबस्ताचीच ड्यूटी असते. त्यामुळे चोरी, घरफोडीवर सध्यातरी ठोस उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांची सतर्कता हाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.