कोरोना काळात राज्यात 18 हजार अपघाती मृत्यू!

कोरोना काळात 18 हजार अपघाती मृत्यू! अपघात अन्‌ मृत्यूची 'ही' प्रमुख कारणे
कोरोना काळात 18 हजार अपघाती मृत्यू! अपघात अन्‌ मृत्यूची 'ही' प्रमुख कारणे
कोरोना काळात 18 हजार अपघाती मृत्यू! अपघात अन्‌ मृत्यूची 'ही' प्रमुख कारणेGallery
Updated on
Summary

अतिवेग, महामार्गांवरील खड्डे, मद्यपान, मोबाईल टॉकिंग, हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न केल्याने 11 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघात व मृत्यू झाल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदविले आहे.

सोलापूर : कोरोना (Covid-19) काळात संचारबंदीसह (Lockdown) घराबाहेर पडण्यावर निर्बध होते. तरीही, मार्च 2020 ते ऑगस्ट 2021 या काळात राज्यभरात 38 हजार 104 अपघातांमध्ये (Accident) तब्बल 17 हजार 949 जणांचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. अतिवेग, महामार्गांवरील खड्डे, मद्यपान, मोबाईल टॉकिंग, हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न केल्याने 11 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघात व मृत्यू झाल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी (Highway Police)नोंदविले आहे.

कोरोना काळात 18 हजार अपघाती मृत्यू! अपघात अन्‌ मृत्यूची 'ही' प्रमुख कारणे
भोंदू मनोहरमामाचा 'अटकपूर्व'चा प्लॅन पोलिसांनी लावला उधळवून!

आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना काळात सर्वाधिक तीन हजारांहून अधिक अपघात झाले आहेत. दुसरीकडे नाशिक, पुणे, नगर, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, सातारा, धुळे आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक अपघात अन्‌ अपघाती मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांत झाली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 39 ब्लॅकस्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) असून दुसऱ्या क्रमांकावर सोलापूर ग्रामीणमध्ये 31 ठिकाणे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 25 तर नाशिकमध्ये 22 ठिकाणे अशी आहेत, त्या ठिकाणी सर्वाधिक अपघातांची नोंद होते. राज्यभरात चार-सहा पदरी महामार्गांचे झाळे विस्तारले आहे. त्या महामार्गांवरून प्रवास करताना बहुतेक वाहनांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केलेले असते. महामार्गांवर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी दुभाजक तोडून रस्ता ओलांडण्याचेही प्रकार सुरू आहेत. वाहन बंद पडल्यानंतर रस्त्यावरच वाहन थांबलेले असते, महामार्गांवर विजेची सोय नाही, त्यातूनही अपघात वाढले आहेत. राज्यातील ब्लॅकस्पॉटची संख्या तेराशेवरून आता तीनशे झाली आहे. तरीही, अपघात आणि मृत्यू वाढल्याने जिल्हा स्तरावरील शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या माहितीवर संशय घेतला जात आहे.

अपघात अन्‌ मृत्यूची प्रमुख कारणे...

  • वेगमर्यादा ओलांडून अतिवेगाने वाहन चालविणे; हेल्मेट, सीटबेल्टचा वापर नाहीच

  • दारू पिऊन (मद्यपान) निष्काळजीपणाने वाहन चालविणे

  • रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे; दुभाजक तोडून रस्ता ओलांडणे

  • मोबाईल टॉकिंग; विशेषत: शहरात सिग्नल तोडून जाताना होताहेत अपघात

  • अपघातानंतर जखमींना वेळेत मिळत नाहीत उपचार

कोरोना काळात 18 हजार अपघाती मृत्यू! अपघात अन्‌ मृत्यूची 'ही' प्रमुख कारणे
नोकरीनिमित्त तरुण बनले 'पुणेरी सोलापूरकर'!

सर्वाधिक अपघात व मृत्यू (मार्च 2020 ते ऑगस्ट 2021 पर्यंतची स्थिती)

  • जिल्हा - अपघात - मृत्यू

  • नाशिक - 2,605 - 1,521

  • पुणे - 2,574 - 1,350

  • मुंबई - 2,657 - 440

  • नगर - 1,825 - 992

  • सोलापूर - 1,395 - 743

  • नागपूर - 2,407 - 947

  • औरंगाबाद - 1,357 - 681

  • सातारा - 1,017 - 606

  • धुळे - 976 - 574

  • अमरावती - 1,324 - 552

  • बीड - 895 - 541

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.