मुंबई : अजित पवार आपल्या आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानं शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. यापार्श्वभूमीवर न्याय द्यावाच लागेल, न्याय दिल्याशिवाय जणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (There must be given justice direct warning of Sanjay Sirsath to Govt after Ajit Pawar entry in govt)
शिरसाट म्हणाले, "सत्तेत तडजोडी तर कराव्या लागतात. यामध्ये शिवसेना-भाजपतील कोणाकडं किती खाती द्यायची याची रणनीती आखायचं काम दोन्ही नेत्यांचं आहे. याची अंमलबजावणी केली जाईल. न्याय हा दिला जाईल, न्याय द्यावा लागेल न्याय दिल्याशिवाय जमणार नाही. कारण राष्ट्रवादी आमच्यासोबत आलीए म्हणून आपले हात खाली झालेत असं समजण्याचं कारण नाही" (Latest Marathi News)
मुळात आम्हाला बहुमताची गरज नव्हती मग राष्ट्रवादीला सोबत का घेतलं? १७२ पर्यंत आमचं संख्याबळ असताना यांना का घेतलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतू राजकारणात काही समिकरण बसवताना हे करावं लागतं. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काही लोकांची वैयक्तिक ताकद असते पक्ष तर असतोच पण वैयक्तिक ताकद असते. मग ही ताकद एकत्र झाल्यानंतर युतीच्या जागा वाढणार असतात. (Marathi Tajya Batmya)
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमचेच कार्यकर्ते असे आहेत की जे विचारत आहेत की, राष्ट्रवादीला ९ मंत्रिपदं दिली मग कसं चालेल? पण याची सर्वांची उत्तरं मुख्यमंत्री-उपमुख्यंमत्र्यांकडं आहेत. येत्या रविवारपर्यंत दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्रिपदांचं काय? हे प्रश्नचिन्ह आहेत ना त्याचा उलगडा या आठवड्यात होईल. एकदमच सर्वकाही सोडून द्यायचं मग सत्ता काय कामाची मग सत्तेत का रहायचं? त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असंही शिरसाट यावेळी म्हणाले.
संजय शिरसाटच्या अधिकारांवर गुठलीही गदा आलेली नाही. इतरांच्याही हक्कांवर गदा येऊ नये याची काळजी शिंदे साहेब घेतील. सत्तेत असल्यानंतर एक वेगळं वलंय त्यामागे असतं. सत्तेत का जायचं? काम करता येतं, अजितदादा का आले त्यांना काम करण्याची उर्मी आहे. तसंच आमचही आहे त्यामुळं आम्हाला काही येणार नाही, हे मनातून काढून टाका. लोकसभा विधानसभा येतेय म्हणून आम्ही खिरापत वाटतोय असं कोणीही समजू नये, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.