विखेंनी डाव साधला, उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसले मात्र शिंदेंसाठी खुर्चीच नाही, फडणवीसांनी ताबडतोब...

 Vikhe vs Shinde
Vikhe vs Shinde
Updated on

Vikhe vs Ram Shinde: राम शिंदे आणि विखे पाटील हा वाद महाराष्ट्राला नवा नाही. हे दोन्ही नेते आता भाजपमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस या दोघांचे वाद मिटवण्याचे प्रयत्न करत आहेत. या दोघांमध्ये कोणतेही वाद नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान अहमदनगर जिल्हा नियोजन आढावा बैठकीत राम शिंदे यांच्यासाठी खुर्ची नसल्याची बाब समोर आली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मान्यवरांसाठी खुर्ची ठेवण्यात आल्या. मात्र राम शिंदे यांच्यासाठी खुर्ची नव्हती.

त्यामुळे राम शिंदे व्यासपिठावरुन खाली जात होते. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंसाठी खुर्ची मागवली. देवेंद्र फडणवीस यांच्या एका बाजुला विखे पाटील तर दुसऱ्या बाजुला राम शिंदे बसले होते.

 Vikhe vs Shinde
किती ही मस्ती! आधिकाऱ्याचा फोन पडला बंधाऱ्यात; ३ दिवस ३० एचपी पंपाने नासवलं पाणी

या बैठकीनंतर फडणवीस म्हणाले दोघांमध्ये वाद असले तरी त्यांच्यामध्ये मी बसलो आहे. दोघांमध्ये काही वाद नाही. समन्वय आहे आणि वाद असला तरी वादळ नाही. तो चहाच्या पेल्यातील वाद आहे. तो वाद आता संपला आहे.

राम शिंदे यांचे राजकीय अस्तित्व कमी करण्याचा हा प्रयत्न होता का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 Vikhe vs Shinde
Rahul Gandhi : राहुल गांधींना पासपोर्ट मिळणार, दिल्ली न्यायालयाचा मोठा दिलासा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.