आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

सर्वच पक्षांचे देशातील व राज्यातील नेतेमंडळी आपापल्या उमेदवारांच्याच प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये सभा घेणार आहेत. पक्षांच्या शहर व जिल्हाप्रमुखांनी नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्या तारखा फायनल केल्या आहेत.
narendra modi rahul gandhi uddhav thackeray sharad pawar
narendra modi rahul gandhi uddhav thackeray sharad pawarsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून प्रचाराची रणधुमाळी आजपासून (मंगळवार) सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. पण, सर्वच पक्षांचे देशातील व राज्यातील नेतेमंडळी आपापल्या उमेदवारांच्याच प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये सभा घेणार आहेत. पक्षांच्या शहर व जिल्हाप्रमुखांनी नेत्यांशी संपर्क साधून त्यांच्या तारखा फायनल केल्या आहेत.

महायुतीतील भाजपचे जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, पंढरपूर-मंगळवेढा, सोलापूर शहर मध्य व माळशिरस या सहा मतदारसंघात उमेदवार आहेत. सोलापूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची १२ नोव्हेंबरला तर माधवी लता यांची १० नोव्हेंबरला शहरातील मतदारसंघांसाठी सभा होणार आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा सोलापुरातच होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा, अक्कलकोट व सोलापूर शहरात सभा होणार आहेत.

दुसरीकडे करमाळा, बार्शी व सांगोल्यात शिवसेनेचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढील आठवड्यात सभा नियोजित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा व मोहोळमध्ये उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी पक्षप्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर हेही सभा घेणार आहेत. तर एमआयएमच्या ‘शहर मध्य’मधील उमेदवारासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांची १३ नोव्हेंबरला सोलापुरात प्रचारसभा होणार आहे.

नाईट लॅण्डिंग नसल्याने बहुतेक सभा दुपारीच

सोलापूरचे विमानतळ सुरु झाले असून अद्याप मार्ग निश्चित न झाल्याने येथून विमानसेवा सुरु झालेली नाही. दरम्यान, विमानतळावर नाईट लॅण्डिंगची सुविधा नसल्याने देशपातळीवरील नेत्यांच्या सोलापुरातील सभा या दुपारच्या वेळेतच होणार आहेत. आज (बुधवारी) मंगळवेढ्यात मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभा होणार असल्याचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर यांनी सांगितले.

काँग्रेस

  • राहुल गांधी (विरोधी पक्षनेता, लोकसभा)

  • सिद्धरामय्या (मुख्यमंत्री, कर्नाटक)

  • अनुमुला रेवंत रेड्डी (मुख्यमंत्री, तेलंगण)

  • सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री)

  • प्रणिती शिंदे (खासदार)

---------------------------------------------------------------

भाजप

  • नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

  • योगी आदित्यनाथ (मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश)

  • देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)

  • माधवी लता (भाजप नेत्या)

-----------------------------------------------------------

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

  • शरद पवार (ज्येष्ठ नेते)

  • जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष)

  • अमोल कोल्हे (खासदार)

  • सुप्रिया सुळे (खासदार)

----------------------------------------------------------

मनसे

  • राज ठाकरे (मनसे, प्रमुख)

------------------------------------------------------------

  • एमआयएम

  • असदुद्दीन आवैसी (खासदार, एमआयएम)

-------------------------------------------------------------

शिवसेना

  • एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)

  • ---------------------------------------------------------

  • राष्ट्रवादी काँग्रेस

  • अजित पवार (उपमुख्यमंत्री)

‘महाविकास’साठी राहुल गांधी, शरद पवार, ठाकरेंच्या सभा

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे शहर मध्य, पंढरपूर-मंगळवेढा व अक्कलकोटमध्ये उमेदवार आहेत. त्या सर्वच उमेदवारांसाठी राहुल गांधींची सोलापूर शहरात सभा नियोजित असल्याचे ‘शहर मध्य’चे उमेदवार चेतन नरोटे यांनी सांगितले. याशिवाय तेलंगणचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याही सभा होतील, असेही ते म्हणाले. तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे हेही मतदारसंघात ठाण मांडून असतील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा, माढा, सोलापूर शहर उत्तर, माळशिरस, करमाळा येथे उमेदवार असून पुढील आठवड्यात या उमेदवारांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभा होणार आहेत. शिवसेनेचे सांगोला, दक्षिण सोलापूर, बार्शी येथे उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्वच ठिकाणी सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे १० नोव्हेंबरला सांगोल्यात व दक्षिण सोलापुरात सभा घेणार आहेत. त्यानंतर १२ नोव्हेंबरला बार्शीतही सभा होईल, असे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()