अशुद्ध पाण्यामुळे होवू शकतात ‘हे’ आजार! १०० ते ५०० पेक्षा जास्त ‘टीडीएस’ नकोच; उकळून गार केलेले पाणी शुद्ध

दुष्काळाची तीव्रता वाढत असून कडक उन्हाळ्यात महापालिकेसह गावागावातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत होवू लागला आहे. त्यामुळे जारचे उद्योग वाढल्याची स्थिती आहे. अनेकजण पर्यायी व्यवस्था म्हणून बोअरमधील पाणी देखील पिण्यासाठी वापरतात.
sakal
उन्हाळ्यात जास्त पाणी प्याesakal
Updated on

सोलापूर : आता दुष्काळाची तीव्रता वाढत असून कडक उन्हाळ्यात महापालिकेसह गावागावातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत होवू लागला आहे. त्यामुळे जारचे उद्योग गावागावात व शहरांमधील नगरांमध्ये वाढल्याची स्थिती आहे. अनेकजण पर्यायी व्यवस्था म्हणून बोअरमधील पाणी देखील पिण्यासाठी वापरत आहेत. पण, पाण्यामुळे पोटाचे विकार उद्‌भवू शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध व स्वच्छ जरूरी असून त्यासाठी पाण्यातील टीडीएस १०० ते ५०० पर्यंतच आवश्यक आहे. उन्हाळ्यात तहान लागली की भरपूर पाणी प्यावे.

उकळून गार केलेले पाणी शुद्ध!

प्युरिफाईड वॉटर, डिस्टिल्ड वॉटर, मिनरल वॉटर असे पाण्याचे प्रकार आहेत. जमिनीवरून काही उंचीवर असताना पावसाचे पाणी डिस्टिल्ड वॉटरप्रमाणेच असते. पण, हे पाणी जमिनीवर पडताच प्रदूषित होते. हवेतील कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड अशा प्रदुषकांमुळे देखील पाणी प्रदूषित होते. प्रदूषित पाण्यामुळे २५० प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. रिव्हर्स ऑस्मोसिसचा वापर करून पाणी शुद्ध करताना पाण्यातील पोषकतत्व सुद्धा काढून टाकले जातात. त्यामुळे वारंवार फिल्टर केलेले पाणी चांगले नसते. रेफ्रिजरेटेड पाण्यातही सूक्ष्मजीवांचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे उकळून गार केलेले पाणी पिण्यायोग्य ठरते. कापडातून गाळलेले पाणी देखील पिण्यासाठी वापरू शकता. अल्ट्रा-व्हायलेट लाइट फिल्टर वापरून पाणी सहजपणे शुद्ध करता येते, असे तज्ज्ञ सांगतात.

अशुद्ध पाण्यामुळे होवू शकतात ‘हे’ आजार

  • पाण्यात फ्लोराइड एकपेक्षा जास्त असल्यास डेंटल फ्लोरोसिस आणि सोडियम जास्त असल्यास ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो.

  • शेतातील खतांमध्ये असणारे नायट्रेट पिण्याच्या पाण्यातून शरीरात गेल्यास रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो व श्वास घेण्यास त्रास होतो, चक्कर येते, डोळ्यांची बुबळे निळी पडतात.

  • पाण्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असल्यास त्वचेवर पांढरे चट्टे पडतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचा त्रास होऊ शकतो.

  • ‘टीडीएस’ कमी असलेले पाणी पिल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पाण्याच्या चवीत फरक पडल्यास किंवा रंग आला असल्यास पाण्यात काहीतरी गडबड असते. त्यामुळे सरकार मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाण्याच्या टेस्ट करून घ्याव्यात.

१०० ते ५०० पेक्षा जास्त ‘टीडीएस’ नकोच

पिण्याच्या पाण्याचा टीडीएस १०० पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ त्यात शरीराला आवश्यक खनिजे नाहीत. दुसरीकडे पाण्याचा टीडीएस ५०० पेक्षा जास्त असेल तर त्या पाण्याला ‘हार्ड वॉटर’ म्हणतात. हे पाणी पिण्यायोग्य नसते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा टीडीएस हा १०० ते ५०० च्या दरम्यान असावा. आपण जे पाणी पितो त्याचा टीडीएस किती आहे, हे जाणून घेण्यासाठी बाजारात ‘टीडीएस’ मीटर मिळतात. त्याचा वापर करूनही पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची खात्री करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()