Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघातांच्या मालिकेनंतर दरोडेखोरांचा थरार; प्रवासी वाहनावर हल्ला, सहा प्रवासी जखमी

Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargESAKAL
Updated on

कारंजा: कृषी समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिकांनी सर्वसामान्य नागरिक धास्तावले असताना आता या महामार्गावर दरोडेखोरांचा धोका निर्माण झाला आहे.

१७ जूनच्या मध्यरात्री समृद्धी हायवे लोकेशन १९५ जवळ नागपूरवरून मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर अज्ञात दरोडेखोरांनी दगडफेक करून बस लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना घडली.

यामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षा ही रामभरोसे आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्स ही खासगी बस नागपूरवरून मुंबईला निघालेली होती. परंतु ही बस समृद्धी हायवे लोकेशन १९५ कारंजाजवळ असलेल्या ढाकली किनखेड या गावाजवळ आली असताना या बसवर अज्ञात ७ ते ८ दरोडेखोरांकडून दगडफेक करण्यात आली.

Samruddhi Mahamarg
Karjmukti Yojana: कर्जमुक्ती योजनेचा खेळखंडोबा; अजूनही चाळीस टक्के शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत

या घटनेमध्ये बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. तर दगडफेकीमुळे बसमधील सहा प्रवासी सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत. सदर घटना घडत असतानाच चालकाने प्रसंगावधान राखत बस न थांबवता ती कारंजा टोलनाक्यापर्यंत आणली.

ज्यामुळे या घटनेतील मोठा अनर्थ टाळला. घटनेची माहिती मिळताच समृद्धी हायवे लोकेशन पायलट विधाता चव्हाण व डॉ.पास्कर राठोड घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणले.

Samruddhi Mahamarg
Pik Karj Yojana : शून्य टक्के पीककर्ज योजनेचा खेळखंडोबा

या घटनेत दयाराम राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. इतर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

या प्रकरणाची कारंजा ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

परंतु या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटनांसोबतच आता चोरीच्या घटना देखील होत असल्याने या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

आधी अपघातांची श्रृंखला आणि त्यानंतर आता चोरीच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ यामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.