Opposition Meeting: शरद पवारांमुळे विरोधकांची एकजूट अडचणीत, बैठकीचा मुहूर्त सप्टेंबरमध्ये?

विरोधकांची तिसरी बैठक सप्टेंबरमध्ये? शरद पवारांबाबत विरोधक तणावात, नेत्यांच्या बैठकीसाठी मुहूर्त सापडेना
Opposition Meeting
Opposition MeetingEsakal
Updated on

देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीची तारीख अद्याप ठरली नाही. दिग्गज नेत्यांच्या तारखांबाबत अडचण निर्माण झाली आहे. काही नेत्यांनी २५-२६ ऑगस्टला मुंबईत येण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. अशा स्थितीत विरोधकांची ही महत्त्वाची बैठक सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Opposition Meeting
PM Modi-Sharad Pawar : आठ वर्षांनी मोदी- पवार पुण्यात एकाच व्यासपीठावर

गेल्या काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटनेची बांधणी आणि डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार ऑगस्टच्या मध्यापासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहीती आहेत.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच व्यासपीठावर दिसणार

1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात एका कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. त्याच कार्यक्रमासाठी शरद पवार यांनाही आमत्रंण देण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. हा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि पंतप्रधान पहिल्यांदाच मंचावर एकत्र दिसणार आहेत. शरद पवारांच्या या कार्यक्रमाबाबत काही विरोधी पक्षांमध्ये गदारोळ सुरू असून नेत्यांनी अंतर्गत शंका उपस्थित केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Opposition Meeting
Uddhav Thackeray News : 'मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही...'; भाजपकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

पवारांबाबत विरोधी पक्षांमध्ये तणाव?

शुक्रवारी विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या सदस्यांची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली तर काहींनी शरद पवार हे महायुतीतील ज्येष्ठ नेते असल्याचेही सांगितले. त्यांनी मोदींसोबत स्टेज शेअर केल्याने युतीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

विरोधकांच्या मुंबई बैठकीची जबाबदारी उद्धव यांच्याकडे आहे

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेस चांगलीच सक्रिय झाली आहे. 26 सदस्यांच्या विरोधी आघाडीसाठी पक्ष सध्या एका सूत्री अजेंड्यावर काम करत आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस सदस्यांची संख्या कमी आहे. विरोधी आघाडीच्या मुंबई बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने घेतली आहे. वास्तविक, अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत गोंधळाची परिस्थिती आहे. अशा स्थितीत महायुतीच्या सभांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

Opposition Meeting
Maharashtra Politics: 'काँग्रेसकडून मविआडी फोडण्याचे प्रयत्न, अनेक आमदार भाजपमध्ये येतील', भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.