नवाब मलिकांना ईडीचा पुन्हा दणका; फराज मलिकला तिसरं समन्स पाठवणार

Nawab Malik vs ED
Nawab Malik vs EDesakal
Updated on
Summary

आज ईडीनं पुन्हा नवाब मलिकांना दुसरा धक्का दिलाय.

मुंबई उच्च न्यायालयानं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना धक्का दिलाय. केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच, ईडीची कारवाई कायदेशीरच असल्याचं सांगत न्यायालयानं मलिक यांनी दाखल केलेली याचिका (HC Rejected Nawab Mailk Petition) फेटाळून लावलीय. ईडीनं आपणास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या या संस्थेच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. आपणास करण्यात आलेली अटक ही कायद्याला धरुन नसल्याचं मलिकांचं म्हणणं होतं. मात्र, काल (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मलिक यांची याचिका फेटाळून लावलीय.

Nawab Malik vs ED
'हिजाब बंदी'च्या निर्णयावर केरळचे राज्यपाल खूश, जाणून घ्या कारण

आज (बुधवार) ईडीनं (ED) पुन्हा मलिकांना दुसरा धक्का दिलाय. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुलगा फराज मलिक (Faraz Malik) याला 15 मार्च रोजी समन्स बजावले होते. मात्र, तो ईडीसमोर हजर झाला नाही. त्यानंतर ईडीनं दुसरं समन्स दिलं होतं. त्यानंरही फराज चौकशीसाठी हजर राहिला नाही. आता त्याला लवकरच तिसरं समन्स पाठवलं जाणार असल्याचं ईडीनं सांगितलंय. फराझची कुर्ला, मुंबई (Kurla, Mumbai) येथील गोवाला बिल्डिंगच्या (Goawala Building) व्यवहारांबद्दल चौकशी करण्यासाठी समन्स पाठवलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी ईडीनं फराजला समन्स बजावले होते. त्यानंतर फराजनं आपला वकील पाठवून एक आठवड्याचा वेळ मागितला होता. मात्र, ईडीनं वेळ देण्यास नकार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.