ICMRची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात मोठी माहिती

राज्यातल्या करोना रुग्णसंख्येचा आलेख आता कमी होत असल्याचे दिसून येत आहे
Rajesh Tope
Rajesh Topeटिम ई सकाळ
Updated on

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांनी महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या अखेरीस ओसरण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. या राज्यांमध्ये समोर आलेली रूग्णसंख्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस खाली येतील. मार्चपर्यंत देशातील कोविड प्रकरणांमध्ये एकूण घट अपेक्षित आहे, असे डॉ. समीरन पांडा म्हणाले.

Rajesh Tope
बळकावलेल्या भागावर चीनने बांधला पूल, फोटोमुळे ड्रॅगनचा पर्दाफाश

यावर राज्याचे आरोग्यमंत्री यांनी राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रतिक्रीया दिली. राज्यातल्या करोना रुग्णसंख्येचा आलेख आता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दर आठवडय़ाला ते आणखी शिथील होत जातील. मार्चच्या मध्यापर्यंत आपण तिसऱ्या लाटेच्या शेवटाकडे जाऊ, असे तज्ञांच्या मतावरून वाटत आहे, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.