Sanjay Raut : राऊतांना फडणवीसांबद्दल सहानुभूती, म्हणाले 'भ्रष्ट मंत्र्यांचं ओझं...'

राज्यातील सरकार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लादलेलं सरकार
Sanjay Raut
Sanjay RautEsakal
Updated on

राज्यातील सरकार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लादलेलं सरकार आहे. फडणवीस भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करत आहेत. फडणवीस सध्या जी सारवासारव करत आहेत, ते मनातून करत नाहीत असं मोठं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिंदे गटातील भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घालण्यात भाजपाला कठीण जात असल्याचेही संजय राऊत बोलताना म्हणाले आहेत.

अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत यांच्याविरोधात भूखंड घोटाळ्याचे आरोपामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत. विरोधी पक्षनेते असताना भ्रष्टाचाराची प्रकरणं अत्यंत समर्थपणे लावून धरणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करावी लागतेय, हे पाहून त्यांची सहानुभूती वाटतेय, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

Sanjay Raut
Shivsena News: शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? आणखी एक नेता...

पुढे बोलताना ते म्हणाले की, विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबर मंत्री संजय राठोड, मंत्री उदय सामंत यांच्याच नाही तर आणखीही मंत्री समोर येतील. त्यांचे कारनामे येतील. शिंदे फडणवीस सरकार अडचणीत आहे. शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या सर्व आमदारांचे कामांचे बॉम्ब फुटणार आहेत हे सरकार अडचणीत आहे. त्याचबरोबर आमदारांच्या लवंगी फटाके आज फुटणार आहेत असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले आहेत.

Sanjay Raut
Maharashtra Assembly Elections 2024: ठरलं? लोकसभेसोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये. सरकारने तयार केलेला प्रस्ताव प्रभावी नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. सध्या संपूर्ण सरकार अडचणीत आहे या भ्रष्ट मंत्र्यांना सोबत घेऊन त्यांचं ओझं बाळगत पुढं सरकार टिकवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशक्य असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.