शिक्षणाधिकाऱ्यांचे महाविद्यालयांना ‘हे’ आदेश! आजपासून अकरावीचे प्रवेश; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘येथे’ प्रवेशाची संधी; जाणून घ्या, शाखानिहाय प्रवेश क्षमता

दहावीच्या निकालानंतर मंगळवारपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देवू नयेत, असे स्पष्ट आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी प्राचार्यांना दिले आहेत.
sakal
admissionsolapur
Updated on

सोलापूर : दहावीच्या निकालानंतर उद्यापासून (मंगळवार) इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नयेत, असे स्पष्ट आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी प्राचार्यांना दिले आहेत.

अकरावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. विज्ञान शाखेतून ३२ हजार तर वाणिज्य शाखेतून २३ हजार ५०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. दहावीच्या निकालानंतर मंगळवारपासून महाविद्यालय स्तरावर प्रवेश अर्जांची विक्री सुरू होणार आहे. १५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असून तत्पूर्वी प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे निर्देश देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्रवेश प्रक्रियेवेळी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित शाळेची सखोल चौकशी करून त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्यांवर कारवाई होईल, असा इशाराही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, दहावीच्या निकालानंतर आयटीआयचे प्रवेश देखील सुरू होतील. शासकीय तंत्रनिकेतनमध्येही दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या डिप्लोमासाठी प्रवेश मिळतील. त्याठिकाणीही गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार असून पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया देखील आता सुरू झाली आहे.

शाखानिहाय प्रवेश क्षमता

  • विज्ञान

  • ३२०००

  • वाणिज्य

  • २३५००

  • कला

  • १७०००

  • एमसीव्हीसी, आयटीआय

  • ३०००

दोन विषय गेलेल्यांना ‘ऐटीकेटी’तून प्रवेश

इयत्ता दहावीच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील इयत्ता अकरावीत प्रवेश घेता येणार आहे. दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील तीन हजार ११९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यातील दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांनाच कला शाखेतून अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. मात्र, त्यांना जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत किंवा पुढच्या वर्षीच्या मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागणार आहे. ऐटीकेटीतील तो विद्यार्थी अकरावी उत्तीर्ण झाला, तरीदेखील तो दहावीचे अनुत्तीर्ण विषयात पास होत नाहीत, तोवर त्याला पुढच्या वर्गात प्रवेश घेता येत नाही.

...त्या कनिष्ठ महाविद्यालयांची होणार चौकशी

प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळांच्या परिसरात, वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत. इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून अवाढव्य शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेची चौकशी केली जाईल. सर्वच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.