नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना फोनवरुन धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतः तायवाडे यांनी याबाबत माहिती दिली असून आपण कोणत्याही धमक्यांना भीक घालत नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. (threat call to National OBC Federation President Babanrao Taiwade)
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, मीडियामधील माझं भाषण ऐकून काही जणांनी वेगळाच अर्थ काढला आहे. धमकी देताना तुम्ही असं बोललात तसं बोललात असं मला त्यांनी सांगितलं. पण मी त्यांना म्हटलं मी वाईट काय बोललो आहे, त्याचं रेकॉर्डिंग मला पाठवा. त्याशिवाय मी तुमच्याशी असं परस्पर बोलणार नाही.
पुढ त्यांनी जे काही बोलले त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही. धमकी देणारा वयानं लहान असेल तर त्याच्याविरोधात काय तक्रार करायची? पण गरज पडल्यास मी पोलिसांत तक्रार करेन. आम्ही मीडियासमोर काय बोललो? हे आम्हाला त्यांनी सांगावं. (Latest Marathi News)
पण आमच्या संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी जे जे बोलावं लागेल ते आम्ही बोलू. लोक त्याचा अर्थ काय काढतात त्याची मी चिंता करत नाही. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी ओबीसींच्या संविधानीक अधिकारांच्या संरक्षणासाठी लढत राहणार, असंही तायवाडे यांनी सांगितलं आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.