Chiplun News : चिपळुणात 3 बांगलादेशी घुसखोर ताब्यात; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई, मोबाईलसह कागदपत्रे हस्तगत

बांगलादेशातून (Bangladesh) भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले.
Anti Terrorism Squad Ratnagiri
Anti Terrorism Squad Ratnagiriesakal
Updated on
Summary

घुसखोरांकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

चिपळूण : बांगलादेशातून (Bangladesh) भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. गेले काही महिने ते तेथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवादविरोधी पथकाने (Anti Terrorism Squad Ratnagiri) कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.

Anti Terrorism Squad Ratnagiri
Kagal Politics : मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, त्यांच्याविरुद्ध लढाई अटळ; समरजीत घाटगेंचं ओपन चॅलेंज

त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. बांगलादेशहून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खेर्डी मोहल्ला परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करत होते.

Anti Terrorism Squad Ratnagiri
Fake Notes : सांगलीत 'इतक्या' लाखांच्या बनावट नोटा जप्त; विश्रामबाग पोलिसांची मोठी कारवाई, संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील

याविषयीची रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. ३) रात्री १०.३० वा. कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पारपत्र अधिनियम ३ (ए) ६, परकीय नागरिक आदेश कायदा ३ (१) (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल उदय चांदणे, आशिष शेलार यांनी ही कारवाई केली. या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.

Anti Terrorism Squad Ratnagiri
Loksabha Election : 'या' दोन मतदारसंघाबाबत राणेंचं मोठं विधान; शिंदे गटाची गोची? म्हणाले, उमेदवारी कोणाला द्यायची हे..

आधारकार्ड, पॅनकार्डही

मुळचे बांगलादेशी असलेले गुल्लू मुल्ला व त्याच्या दोन्ही मुलांकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधारकार्ड, निवडणूक मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे नागरिकत्त्व नसताना देखील ही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कोणकोणते व्यवहार केले, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.