"क्रूझ ड्रग प्रकरणात महाविकास आघाडीतील तीन मंत्र्याचा सहभाग"

मुंबई पोलीस आयुक्तांकडून गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेचंही कंबोज यांनी केलंय स्वागत
Mohit Kamboj
Mohit Kamboj
Updated on

मुंबई : आर्यन खान क्रूज ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Panday) यांनी गुन्हा दाखल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेचं भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी स्वागत केलं आहे. तसेच या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Govt) तीन कॅबिनेट मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करत याची चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे. (three cabinet ministers Involved in Maha Vikas Aaghadi in cruise drugs case says Mohit Kamboj)

कंबोज यांनी म्हटलं की, मुंबई पोलीस आयुक्तांकडून आर्यन खान केसची थांबवलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे, त्यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. क्रूझ केसशी संबंधीत एनसीबीचे अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून याच्या चौकशीसाठी जी एसआयटी बनवली होती. ही एसआयटी आता बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. त्याची पुन्हा चौकशी करण्याची गरज असल्याचं नव्या पोलीस आयुक्तांनी म्हटलंय, याचं मी स्वागत करतो.

Mohit Kamboj
BMC चा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर; आयुक्तांनी दोन मिनिटांत संपवलं भाषण

यामध्ये सुनील पाटील, किरण गोसावीपासून प्रभाकर साईलपर्यंत तसेच मंत्री नवाब मलिकांपासून शिवसेनेचे एक मंत्री आणि एक मोठे नेते त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार आणि नेते ज्यांचा या संपूर्ण केसमध्ये काय सहभाग आहे. तसेच परेलच्या घटनेचं समन्वयक कोण होतं? असे कोणते दलाल होते आणि कोण लोक होते ज्यांची चर्चा सुरु होती. पण हे संपूर्ण प्रकरण दाबण्यात आलं, याचं सत्य देशासमोर यायला हवं, अशी मागणीही कंबोज यांनी केली आहे.

Mohit Kamboj
पोलीस आयुक्तांचं मुंबईकरांसाठी प्रेमळ ट्वीट! वाहने उचलून नेणार नाही पण...

या प्रकरणात काही लोकांचे स्टेटमेंट का नोंदवण्यात आले नाहीत. कोर्टात सादर करण्यात आलेलं प्रमाणपत्र आणि सत्य यामध्ये तफावत आहे. त्यामुळं याचं खरंखोट व्हायला हवं. माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याप्रकरणी एफआयआर दाखल करावा. गुन्हेगारांना सोडू नये, मी स्वतः तुमच्याकडे येऊन माझ्याकडील काही पुरावे देऊ इच्छितो. यामध्ये ज्या मोठ्या लोकांचा हात आहे ते सध्या अधिवेशनात बसले आहेत. त्यांचा यामध्ये काय सहभाग आहे, हे संपूर्ण जगासमोर यायला हवं, असंही कंबोज यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()