SP सातपुतेंच्या ‘ऑपरेशन परिवर्तना’चे सक्सेस! ‘बंजारा ब्रँड’चे तीन दिवसीय प्रदर्शन

‘ऑपरेशन परिवर्तन’च्या माध्यमातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकारातून हातभट्टी गाळणाऱ्या तांड्यावरील तरूणांना नोकरी मिळाली. अनेकांना स्वयंरोजगारासाठी बॅंकांकडून अर्थसहाय मिळवून दिले. त्याच कुटुंबातील महिलांना ‘बंजारा ब्रँड’मधून सुबक, आकर्षक कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यास प्रोत्साहित केले.
OPRATION PARIVARTAN
OPRATION PARIVARTANSakal
Updated on

सोलापूर : ‘ऑपरेशन परिवर्तन’च्या माध्यमातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकारातून हातभट्टी गाळणाऱ्या तांड्यावरील तरूणांना नोकरी मिळाली. अनेकांना स्वयंरोजगारासाठी बॅंकांकडून अर्थसहाय मिळवून दिले. त्याच कुटुंबातील महिलांना ‘बंजारा ब्रँड’मधून सुबक, आकर्षक कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यास प्रोत्साहित केले. आता त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा म्हणून, ता. २२ ते २४ जुलै या काळात ग्रामीण पोलिस मुख्यालयातील ‘अलंकार हॉल’मध्ये त्या वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन जूनमध्येच करण्याचे नियोजन ठरले होते. पण, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीमुळे ते लांबणीवर पडले. तेवढ्यात राज्यात सत्ता परिवर्तन झाले. त्यामुळे आता या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ता. २२ जुलैपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री ठरल्यास त्यांच्या हस्ते किंवा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक सातपुते यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’मधून गुन्हेगारीच्या मार्गाने खडतर प्रवास करणाऱ्यांना चांगला मार्ग दाखविला. त्या कुटुंबातील अनेक तरुणांना नोकरी व त्यांच्या हाताला काम मिळवून दिले. हातभट्टी गाळणारे लोक पुन्हा त्या अवैध व्यवसायाकडे वळणार नाहीत, याची पुरेपूर खबरदारी त्यांनी घेतली आहे. आता या प्रदर्शनातून तांड्यावरील महिलांचा ‘बंजारा ब्रॅण्ड’ देशभर पोहचावा, असे नियोजन आहे. बंजारा समाजाची नामशेष होणारी कला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करेल, असा विश्‍वास सातपुते यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रदर्शनाची वैशिष्टे...

  • दलालाविना विक्रेत्यांकडून थेट ग्राहकांना उपलब्ध होणार बंजारा ब्रँडच्या वस्‍तू

  • विविध तांड्यांवरील जवळपास अडीचशे महिलांचा असणार प्रदर्शनात सहभाग

  • बंजारा ब्रँडमध्ये ज्वेलरी, गादी, उशीचे कव्हर, हस्तकलेच्या साड्या, भित्तीचित्रे यांसह अनेक वस्तूंचा समावेश

  • महिला व लहान मुलांना निश्‍चितच आवडतील वस्तू; पोलिस मुख्यालयात तीन दिवस भरणार प्रदर्शन

  • वाहनांच्या पार्किंगची प्रदर्शनाबाहेर सोय; संपूर्ण नियोजन ग्रामीण पोलिसांकडेच

सोलापूरकरांना वस्तू आवडतील

हातभट्टी दारू गाळण्याचा अवैध व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील महिलांची कला ‘बंजारा ब्रँड’मधून समोर आली आहे. अतिशय आकर्षक व सुबक वस्तू त्यांनी स्वत:च्या कलाकुसरीतून साकारल्‍या आहेत. ता. २२ ते २४ जुलै दरम्यान त्याचे प्रदर्शन असून, सोलापूरकरांना निश्‍चितपणे त्या वस्तू आवडतील, याची खात्री आहे.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()