Agricultural Service Centre : राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद

गुरुवार ते शनिवार ( दि.०२ ते ०४ ) कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील कृषीनिविष्ठा विक्रेत्यांचा विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.
Agricultural Service Centres close
Agricultural Service Centres closesakal
Updated on

मांडवगण फराटा - महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्र. ४०, ४१, ४२, ४३ व ४४ मधील जाचक नियमांना विरोध करणेसाठी व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करावेत यासाठी आज गुरुवार ते शनिवार ( दि.०२ ते ०४ ) कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील कृषीनिविष्ठा विक्रेत्यांचा विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) येथील व या परिसरातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवली आहेत.

कृषी निविष्ठा विक्री करणार्‍या दुकानदारांच्या विरुद्ध कठोर कारवाई करणेसाठी, सध्या प्रचलीत असलेल कायदे पुरेसे असतानाही, राज्य शासनाकडून विधेयक क्र. ४०, ४१, ४२, ४३ व ४४ नुसार पुन्हा नवीन कायदे तयार करणेची प्रक्रिया सुरु आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतूदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत व त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अशक्यप्राय होणार आहे.

राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाहीत. कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा ह्या सीलबंद पॅकींगमध्ये खरेदी करुन शेतक-यांना सीलबंद पॅकींगमध्ये विक्री करीत असल्याने व कृषी विभाग मान्यताप्राप्त सीलबंद व पॅकमधील निविष्ठांचे दर्जाबाबत इ.बाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यांत येऊ नये.

तसेच योग्य निविष्ठा विकणारे कृषी निविष्ठा विक्रेत्यावर जरब बसविण्यासाठी अन्यायकारी कायदे विक्रेत्यावर लादू नयेत अशी राज्यातील सर्व विक्रेत्यांची मागणी आहे. या मागणीसाठी राज्यभरातील सर्व कृषी निविष्ठा विक्री दुकाने तीन दिवस बंद ठेवली आहेत.

या तीन दिवसांचे विक्री केंद्रे बंद कालावधीत पुरवठादार कंपन्याकडून आलेला कृषी निविष्ठा खरेदी करणे किंवा उतरुन घेणेची कार्यवाही होणार नाही. तसेच विक्रीही केली जाणार नाही.

या तीन दिवसांचे विक्री केंद्रे बंद आंदोलनानंतर, विक्रेत्यासाठी जाचक असलेले प्रस्तावित कायद्यांबाबत फेरविचार न झाल्यास, राज्यातील सर्व जिल्हा संघटना व विक्रेते यांचे मागणीनुसार प्रस्तावित कायद्यांचा फेरविचार होईपर्यंत राज्यातील सर्व विक्री केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा माफदा संघटनेने दिला आहे.

राज्य शासनाच्या प्रस्तावित नवीन कायद्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना विक्री व्यवसाय करणे अशक्य असल्याने, नवीन पाच विधेयकाचे निषेधार्थ दि. २/११/२०२३ ते ४/११/२०२३ या तीन दिवसांत राज्यातील सर्व विक्री केंद्रे १०० टक्के बंद रहातील असे महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् सीडस् डिलर्स असोसिएशन (माफदा) या संघटनेने जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.