Independence Day: राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

महाराष्ट्राला एकूण 84 पोलीस पदकं
Maharashtra Police
Maharashtra Policeesakal
Updated on

महाराष्ट्र राज्यातील तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. तर उत्कृष्ट सेवेसाठी पोलिसांचा हा सन्मान करण्यात आला आहे. या तीन पदकांसह महाराष्ट्र राज्याला 84 पोलीस पदके मिळाली आहेत. पोलीस पदकांची घोषणा 14 ऑगस्टला झाली आहे. मुंबई मुख्यालयात कार्यरत असलेले राज्य अन्वेशन विभागाचे सह आयुक्त सुनिल कोल्हे, ठाणे शहराचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप कन्नाळू आणि मुंबई ओशिवरा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

तर महाराष्ट्रासाठी एकूण 84 पदके जाहीर झाली आहेत. यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली असून 42 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी 39 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत.

Maharashtra Police
उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदके जाहीर

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येतात. यावर्षी देशभरातील एकूण 1082 अधिकाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाली असून 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक', 347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 84 पदक मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.