Tipu Sultan Name Controversy: भाजप आमदाराचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Tipu Sultan Name Controversy
Tipu Sultan Name Controversyesakal
Updated on

मुंबई : शहरातील मालाड येथे क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावामुळे सध्या मोठा वाद रंगला आहे. टिपू सुलतान (Tipu Sultan name Dispute) उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आता अमित साटम (BJP Amit satam) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना (CM uddhav thackeray) पत्र लिहिले आहे. काय म्हटलंय पत्रात?

भाजप नेते अमित साटम यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. पत्रात लिहलंय...

"ही जागा ही सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प साठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालक मंत्री अवैधरित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधतायेत, इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करतायेत, असे म्हणत अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुखांना पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थितीमध्ये होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी." (Tipu Sultan Name Controversy)

समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले

"यामुळेच मी समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या मा.महापौर किशोरीताई पेडेणेकर एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की, टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरतायेत."

Tipu Sultan Name Controversy
आदित्य ठाकरेंवर नवी जबाबदारी, 'या' राज्यांची प्रचाराची धुरा सांभाळणार

पालकमंत्री अवैधरित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधतायेत

वास्तविकतेत जर टिपू सुलताना नामफलक अवैध असले, तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालक मंत्र्यांच्या बचाव कार्यातच त्या मग्न आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालकमंत्री अवैध रित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधतायेत , इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करतायेत. आपणास नम्र विनंती आहे की, यावर आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे, ही विनंती." असं या पत्रात साटम यांनी लिहलंय

Tipu Sultan Name Controversy
महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये शीतलहर; १५ जिल्हे गारठणार

भाजपाने टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्यानं महाविकास आघाडीचे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक झाले. त्यातच भाजपानेही टिपू सुलतान यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं जुनं पत्र व्हायरल होत आहे. त्या पत्राविरोधात आता आमदार अमित साटम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()