Tirupati Balaji : भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारिक आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. असे मानल जाते की भगवान बालाजी त्यांची पत्नी पद्मावतीसह तिरुमला येथे वसतात आणि जे भक्त मनापासून परमेश्वराची प्रार्थना करतात त्यांच्या सर्व मनोकामना बालाजी पूर्ण करतात. अशीही एक श्रद्धा आहे की आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर बालाजीला आपले केस अर्पण करावे. या मंदिराशी निगडीत अशी काही रहस्य आहेत जी खूप अलौकिक आणि चमत्कारी आहेत.
1. मूर्तीवरचे केस
मंदिरातील भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस खरे असल्याच सांगितले जाते. त्यांचा कधीही गुंता होत नाही; ते नेहमी मऊसुद राहतात. येथे स्वतः देवाचा वास असल्यामुळे असे मानले जाते.
2. समुद्राच्या लाटांचा आवाज
तसं तर मंदिर समुद्रापासून खूप दूर आहे आणि मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाजही गाभाऱ्यात येत नाही, पण इथे येणारे लोक सांगतात की वेंकटेशाची मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.
3. अदभूत छडी
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे. या काठीबद्दल असे सांगितले जाते की, भगवान बालाजींना लहानपणी या काठीने आपल्या आईपासून मार मिळायचा, त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती. या कारणामूळे, तेव्हापासून आजपर्यंत शुक्रवारी त्याच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावला जातो.
4. गाभाऱ्यातला दिवा नेहमी तेवत असतो
तिरूपति बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो. या दिव्यात कधीही कोणी तेल किंवा तूप टाकत नाही. वर्षानुवर्षे जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहीत नाही.
5. मूर्ती हलल्याचा भास
बालाजीच्या गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे दिसून येते. पण, गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याच जाणवेल.
6. पचई कपूर
भगवान बालाजीच्या मूर्तीवर विशेष प्रकारचा पचई कापूर लावला जातो. कोणत्याही दगडावर तो लावला तर काही वेळाने त्याला तडे जातात, असे वैज्ञानिक मत आहे. पण देवाच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही.
7. खाली धोतर आणि वर साडी
देवाच्या मूर्तीला रोज खाली धोतर आणि वर साडी नेसवली जाते. असे मानले जाते की बालाजीमध्येच माता लक्ष्मीचे रूप समाविष्ट आहे. या कारणास्तव असे केले जाते.
8. हे एक अनोखे गाव आहे
भगवान बालाजीच्या मंदिरापासून 23 किमी अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरील लोकांना प्रवेश नाहीये. येथे लोक खूप नियम आणि संयमाने राहतात. बालाजीला अर्पण करण्यासाठी इथूनच फळे, फुले, दूध, दही आणि तूप दिले जाते.
9. मूर्तीला घाम येतो
भगवान बालाजीची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव दिसते. तसं तर मंदिराच वातावरण अतिशय थंड आहे पण असे असूनही, तिरूपति बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात आणि त्यांची पाठ देखील ओलसर राहते.
10. गुरुवारी चंदनाचा लेप लावला जातो
बालाजीच्या हृदयात लक्ष्मी देवीचा वास असतो. दर गुरुवारी तिरूपति बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून आंघोळ घातली जाते तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मी देवीची छबी दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.