मुंबई : राणा दाम्पत्यावर न केलेल्या गोष्टीबद्दल राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं हाच मुळात घटनोद्रोह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्यावतीनं आमदार अतुल भातखळ यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे कोर्टानं आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांच्यावर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. (To file a case of sedition against Rana couple is treason says BJP Atul Bhatkhalkar)
भातखळकर म्हणाले, "हे महाविनाश आघाडीचं सरकार घटनाविरोधी गोष्टी करतंय. आधी अॅक्शन मग सेक्शन अशी या सरकारची भूमिका आहे. कोणी जर डोईजड होतंय तर त्यांना पोलिसांच्यामार्फत त्रास द्यायचा. हा जो आणिबाणीतला पॅटर्न होता तो हे सरकार करतंय. राज्यात आणीबाणीपेक्षा भयंकर अवस्था आहे. इथं आणीबाणी घोषीत न करता उघड उघड कायदे वाकवले जात आहेत"
दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले, "मला वाटतं भाजपचा या नाट्याशी काहीही संबंध नाही. शिवसेनेला जळीतळी भाजपशिवाय काहीही दिसत नाही. कारण भाजपवर टिका केल्याशिवाय आणि भाजपलं दुषणं दिल्याशिवाय क्षणभर पुढे जात नाही. आता अशा प्रकारे किरीट सोमय्या तिथं येण्याची गरज काय होती हे विचारणाऱ्या शिवसेनेला मला सांगायचंय की, राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असताना तिथं शेकडोंचा जनसमुदाय जमायची काय गरज होती. परंतू सरकार आमचं आहे पोलीस आमचे आहेत म्हणून आमच्याविरोधात बोलाल तर आम्ही फोडून काढू अशी त्यांची दहशतवादी भूमिका दिसते आहे. मला वाटतं हे योग्य नाही. किशोरी पेडणेकर म्हणतात त्याप्रमाणं कोणी नख मारुन रक्त काढतं का? काचा फुटल्याचं दिसतंय तिथं पोलीस आहेत. आमचा तपासावर भरवसा आहे पण तत्पूर्वीच तुम्ही कलम लावून मोकळे झालात. त्यानुसार स्टेटमेंट द्यायचे वातावरण तयार करायचं. तरीही सोमय्यांवर अंगावर गाडी घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस मला या ठिकाणी हतबल झालेले दिसत आहेत. अजूनही किरोट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याठिकाणी अतिशय एकतर्फी प्रकारे कारवाई होत आहे.
सोमय्यांची वर्दी देण्याची काय गरज होती - पेडणेकर
भाजपकडून राणा दाम्पत्याच्या माध्यमातून राज्यात मॅन्युप्युलेश केलं जातंय. सोमय्या यांनी स्वतःहून मी पोलीस स्टेशनला जाणार असल्याची वर्दी देण्याची काय गरज होती. त्यांनी स्वतःहून हे ओढवून घेतलं आहे, असा आरोप शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.