Pawar Vs Bhujbal : ''मला येवल्यात पाठवलं नाही तर..., सभेचं ज्यांनी नियोजन केलं त्यांची साडेतीन वर्षांपूर्वीच हकालपट्टी!''

Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalEsakal
Updated on

नाशिकः अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा कंबर कसू राज्यभरा दौरा करण्याचा निश्चय केलाय. पवारांची पहिली सभा काल येवल्यात झाली. येवला हा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. काल शरद पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आज भुजबळांनी प्रतुत्तर दिलं.

सुरुवातीलाच येवल्यातल्या सभेचा भुजबळांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, कालच्या सभेचं नियोजन ज्या माणिकराव शिंदे या व्यक्तीने केलं होतं. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन पक्षाच्या बाहेर काढलं होतं. २ जानेवारी २०२० ला पक्षातून त्यांची हकालपट्टी केली होती. ते एका दिवसात होत नाही. महिना दोन महिन्यात चौकशी करुन त्यांना काढण्यात आलेलं होतं.

ज्यांना काढलं त्यांचं पक्षासाठी तर योगदान नाहीच परंतु येवल्यासाठीही योगदान नाही. परंतु दुसरं कुणी भेटले नाही त्यामुळे ते पुढे आले. जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिकेत असतात दे दराडे बंधूंनीही ताकद लावली होती. काही ज्येष्ठ मंडळी तिथे स्टेजवर होते त्यांचे तरुण मुलं माझ्या स्वागतासाठी आलेले होते. अनेक लोक पक्षविरोधात काम करणारे, त्रास देणारे किंवा जे आता काहीच काम करत नाहीत, ते सगळे उपस्थित होते, असं म्हणून भुजबळांनी चिमटा काढला.

Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray News : पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, तर भाजप नेत्यांना…; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

एवढे लोक का सोडून गेले याचा विचार करा- भुजबळ

भुजबळ म्हणाले की, "हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? आता ६१-६२ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं ते अजित पवार तर मुख्य आहेत. ते तर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, ते बघा ना का आहेत ते. ही इतकी मंडळी का गेली याचा विचार करा. दिलीप वळसे, दिल्लात अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत मंत्री, खासदार असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याआधी सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब प्रफुल्ल पटेलांनांच पाठवत होते. ते का सोडून गेले याचा विचार करायला पाहिजे." शरद पवारांना वाटतं की, छगन भुजबळांनी हे घडवून आणलं ही चुकीची कल्पना आहे, असेही भुजबळ म्हणाले.

मी ओबीसी आहे म्हणून येवल्यात पहिली सभा- भुजबळ

शरद पवार यांच्या येवल्यातील पहिल्या सभेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तुम्ही पहिली सभा तुमच्या बारामतीत का घेतली नाही? अजित पवार तर बंडाचे प्रमुख आहेत. तेही बारामतीचे आहेत. मग तुमची पहिली सभा दिलीप वळसे यांच्या मतदारसंघात ठरली असताना ती येवला या माझ्या मतदारसंघात का घेतली? मी ओबीसी आहे म्हणून तुम्ही येथे सभा घेतली का? असा खोचक सवाल भुजबळांनी पवारांना केला आहे.

Chhagan Bhujbal
Maharashtra politics: राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग, भाजपाचे दोन ते तीन मंत्री राजीनामा देणार?

''50 ठिकणी माफी मागणार का?''

काल शरद पवारांनी सभेत येवलेकरांची माफी मागितली होती. त्यावर भुजबळ म्हणाले, 'मला हेच कळालं नाही, ते इकडं का आले, त्यांनी बारामतीमध्ये सभा का नाही घेतली.कदाचीत त्यांना वाटलं असेल की, हा ओबीसी नेता आहे, आपण याच्याकडे गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं असेल.

साहेब, मला वाईट वाटलं, तुम्ही माफी कशाला मागता, आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार. ५० ठिकाणी? गोंदिया पासून कोल्हापूरपर्यंत तुम्ही माफी मागणार का? असा प्रश्न देखील भुजबळ यांनी शरद पवार यांना केला आहे. (Marathi Tajya Batmya)

तर पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत तुम्ही माफी मागत जाणार आहात का? पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार का? तुम्ही कशासाठी माफी मागता, असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी केला आहे. शरद पवार यांनी मला येवल्याला पाठवलं नाही तर मीच येवल्यात आलो, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.