मुंबई- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातील एक मोठे नेतृत्व आज आमच्यासोबत आलं आहे. अनेक वर्षे महाराष्ट्राची विधानसभा, देशाची लोकसभा गाजवली. अनेक मंत्रीपद भूषवले आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहता आली. ते ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. देशात विकास होत आहेत. अशा भावना देशातील अनेक नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नेते मुख्य धारेमध्ये येत आहेत. येत्या काळात इतरही काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Today is a happy day for us devendra Fadnavis congratulated Ashok Chavan after joining BJP)
अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर संधी देण्यात येईल का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण नाही या बद्दल केंद्रीय नेतृत्व निर्णय करते. ती केल्यावर तुम्हांला समजेल. अद्याप यावर कसलीही चर्चा सुरु नाही. असे असले तरी अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवले जाई अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. नाना पटोले एका जागेवर टिकू शकत नाहीत. त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका. त्यांना आम्ही पण दिला होता ना प्रवेश! असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.
अशोक चव्हाण यांच्यामुळे राज्य भाजपला फायदा होईलच पण देशाला देखील याचा फायदा होईल. काँग्रेसला लोक सांभाळता येत नाहीत. अशोक चव्हाण यांचा उपयोग कुठे करुन घ्यायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे, असं फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील यावेळी भाजप प्रवेश केला आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.