राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोरील शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निर्णय लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. शिवसेनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज (गुरुवार) होणार होती. मात्र, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी रद्द झाल्याची माहिती आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे आज होणारी सुनावणी रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वेळेअभावी सुनावणीचे वेळापत्रक मात्र आजच तयार होणार असल्याचीही माहिती आहे. आज दिवसअखेर पर्यंत सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मान्यतेनंतरच वेळापत्रकानुसार सुनावणी अपेक्षित आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीची सुनावणी 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं आव्हान आहे, त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी सुरू होणार आहे.
डिसेंबर महिन्यातल्या हिवाळी अधिवेशनावेळी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुर्ण झाली आहे. सुरूवातीला कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत याप्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते, यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आणखी 3 आठवड्यांची मुदत मागितली होती, त्यावर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत निकाल द्यायला सांगितलं आहे. हा निकाल यायच्याआधीच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होणार होती. मात्र, आज ही सुनावणी रद्द झाल्यानंतर आता पुढील सुनावणी कोणत्या दिवशी होणार हे अस्पष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.