Dr Shri Appasaheb Dharmadhikari and shri Sachindada Dharmadhikari
Dr Shri Appasaheb Dharmadhikari and shri Sachindada DharmadhikariSakal media

रेवदंडा: सचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट; युरोपियन विद्यापीठाकडून पदवी बहाल

Published on

अलिबाग : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी (Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari) यांच्या आध्यात्मिक कार्याचा वारसा पुढे नेणारे रायगड भूषण (Raigad bhushan) सचिनदादा धर्माधिकारी (sachindada dharmadhikari) यांना शुक्रवारी (ता.२५) युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी (doctorate degree) बहाल केली. या निमित्ताने जिल्ह्यातील श्री सदस्यांनी (shree sadasya) फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

European International University
European International University Sakal media

धर्माधिकारी कुटुंबाने संपूर्ण जगात आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केले आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने व्यसनमुक्तीसाठी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुण व्यसनमुक्त झाले असून चांगल्या मार्गाला लागले आहेत. जिल्ह्यात स्वच्छता मोहिमेत्त प्रतिष्ठानच्या अतुलनीय सहभागामुळे स्वच्छ सुंदर रायगड जिल्हा ही संकल्पना यशस्वी होत आहे. तलाव, विहिरीतील श्री सदस्यांच्या मदतीने गाळ काढण्याच्या मोहिमा दरवर्षी राबवल्या जातात.

प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेतून वनसंपदेत भर पडली आहे. याचबरोबर निसर्ग चक्रीवादळ, महाड पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजूंना मदतीचा हात देण्याचे कार्य सचिनदादा धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या संपूर्ण कार्यात पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी हे प्रतिष्ठानचे सर्व कार्य पाहत सर्वांना एक नवसंजीवनी देण्याचे काम निःस्वार्थपणाने करत आहेत. हे सर्व कार्य पाहता युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठाने (European International University) मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.