Sharmila Thackeray
Sharmila Thackeraysakal media

मनसेच्या खळखट्याकमुळेच महाराष्ट्रात मराठी टिकली - शर्मिला ठाकरे

Published on

ठाणे : महाराष्ट्रात मराठी भाषा (Marathi Language) बोलण्यासाठी काही जणांना लाज वाटत होती; तर काही जणांना ही सक्ती वाट होती. मात्र १५ वर्षांपूर्वी मनसेने (MNS) केलेल्या खळखट्याक आंदोलनामुळे (MNS Strike) मराठी भाषेच्या पाट्या लागल्या. मराठी भाषेचा वापर होऊ लागला आणि मराठी टिकली, असे वक्तव्य शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी ठाण्यात केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ठाण्यात आल्या होत्या.

Sharmila Thackeray
नवी मुंबई : पालिका निवडणुकीत मनसे खाते उघडणार ?

राम गणेश गडकरी रंगायतन येथे यावेळी करण्यात आलेल्या गौरव महिलांचा या कार्यक्रमावेळी त्यांनी हे विधान केले. कार्यक्रमात महिलांसह मराठी भाषेच्या शिक्षकांचे सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मनसे मध्यवर्ती कार्यालय, विष्णूनगर येथे आयोजित केलेल्या ‘मराठी स्वाक्षरी’ कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावून स्वतः मराठीत स्वाक्षरी केली. दरम्यान, जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपण मराठीच बोलले पाहिजे, आपण मराठीमध्ये संवाद साधला तरच समोरची व्यक्ती मराठीत बोलू शकेल, त्यामुळे प्रत्येकाने आपले मराठीपण जपले पाहिजे, असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.