Commercial cylinder price
Commercial cylinder pricesakal

Commercial Gas Cylinder : व्‍यावसायिक सिलिंडर १५८ रुपयांनी स्वस्त; नवे दर काय?

१९ किलो वजनाच्या व्‍यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती १५८ रुपयांनी घटवल्याचे आज जाहीर
Published on

नवी दिल्ली : १९ किलो वजनाच्या व्‍यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती १५८ रुपयांनी घटवल्याचे आज जाहीर केले. सरकारी तेल कंपन्यांनी आज हा निर्णय जाहीर केला. हा निर्णय आजपासूनच लागू होणार आहे. त्यामुळे नवी दिल्ली येथील १९ किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरची किरकोळ किंमत १,५२२ रुपये एवढी होणार आहे.

यापूर्वी रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर घरगुती एलपीजी गॅसच्या किमती दोनशे रुपयांनी घटवण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. सध्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यापारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. यापूर्वी ऑगस्टमध्येही व्यापारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती ९९ रुपये ७५ पैशांनी घटवण्यात आल्या होत्या; तर जुलैमध्ये या किमती सात रुपयांनी वाढवल्या होत्या.

त्याच्या आधी मेमध्ये या किमती १७२ रुपयांनी; तर जूनमध्ये त्या ८३ रुपयांनी कमी केल्या होत्या. एप्रिलमध्येही या किमती ९१ रुपये ५० पैसे घटवल्या होत्या; तर १ मार्चला या किमती ३५० रुपये ५० पैसे वाढवल्या होत्या; तर घरगुती सिलिंडरच्या किमती ५० रुपयांनी वाढवल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.