PM Kusum Scheme
PM Kusum Schemesakal

PM Kusum Scheme : महाऊर्जाच्या संकेतस्थळाला शेतकऱ्यांच्या अर्जाचा ‘भार’ सोसेना

एकाच वेळी अनेक शेतकरी ‘पंतप्रधान कुसुम योजने’तंर्गत सौर कृषीपंप घेण्यासाठी अर्ज करत असल्याने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (महाऊर्जा) संकेतस्थळाला अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
Published on

पुणे - ‘पंतप्रधान कुसुम योजने’तंर्गत सौर कृषीपंप घेण्यासाठी राज्यभरातून २३ हजार ५८४ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. एकाच वेळी अनेक शेतकरी अर्ज करत असल्याने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (महाऊर्जा) संकेतस्थळाला अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. दरम्यान, ‘महाऊर्जा’कडून संकेतस्थळाचा आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून दिला जात आहे. त्यामुळे सौर कृषीपंपांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.

PM Kusum Scheme
Shiv Rajyabhishek Sohala : ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार व्हा - युवराज संभाजी छत्रपती

काय आहे पीएम-कुसुम योजना

- कृषीपंपांना सौर ऊर्जेचे बळ देण्यासाठी योजना

- केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून अंमलबजावणी

- दरवर्षी एक लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट

- पाच वर्षात पाच लाख कृषीपंप

- १७ मेपासून संकेतस्थळ कार्यान्वित

- जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

कृषीपंपाच्या किमतीवर अनुदान

- सर्वसाधारण प्रवर्ग शेतकरी - ९० टक्के

- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग - ९५ टक्के

PM Kusum Scheme
Land Acquisition : कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादन ऑक्टोबरपूर्वी करणार - विक्रम कुमार

शेतजमिनीनुसार पंपाची क्षमता

शेतजमीन - कृषीपंपाची क्षमता

- अडीच एकरपर्यंत - ३ अश्‍वशक्ती

- पाच एकरपर्यंत - ५ अश्‍वशक्ती

- यापेक्षा अधिक जमीन - ७.५ अश्‍वशक्ती

महाऊर्जाचे आवाहन

- शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा, इतर कोणत्याही बनावट किंवा फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये.

तक्रारींसाठी संपर्क क्रमांक

अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत ०२०-३५०००४५६ किंवा ०२०-३५०००४५७ या संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()