Maharashtra Monsoon Session : यंदाचे पावसाळी अधिवेशनाची वादळी होईल असा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी त्याचा प्रत्यय देखील आला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व विरोधकांनी तर विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. या सर्व घडामोडींमुळे पहिला दिवस वादळी ठरला. पहिल्या दिवसाच्या या घटनानंतर दुसऱ्या दिवसाचे कामकाज वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)
विधान परिषदेमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गट आक्षेप घेऊन सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर विधान सभेतही गोंधळ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान आमदार रोहित पवारांसह काही आमदार लक्षवेधी सूचना मांडणार आहेत.(Latest Marathi News)
त्याचबरोबर उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याच्या मुद्यावरून आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकात पाटील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात बैठक पार पडणार आहे.(Latest Marathi News)
तर काल विधानपरिषदेत विरोधकांनी नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर राज्यपालांनाही भेटून निवेदन देण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.