Toll Charges : रस्त्यांची दुरवस्था असूनही टोलवसुली सुरुच; राज्य सरकारने दिली कबुली

राज्यातील अनेक रस्त्यांच्या दूरवस्था झालेल्या आहेत. तरीहीदेखील टोल चालकांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली केली जाते.
Toll Charges
Toll Chargesesakal
Updated on

नागपूरः राज्यातील अनेक रस्त्यांच्या दूरवस्था झालेल्या आहेत. तरीहीदेखील टोल चालकांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली केली जाते. यासंदर्भात राज ठाकरे यांनी आवाज उठवलेला असताना अशी वसुली होत असल्याचं सरकारने कबुल केलेलं आहे.

काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह इतर विधीमंडळ सदस्यांनी सरकारकडे टोलसंदर्भात विचारणा केलेली होती. टोलवसुलीचं उद्दिष्ट साध्य करुनही राज्यात टोलवसुली सुरु असल्याची कबुली सरकारने दिली आहे.

Toll Charges
Article 370 Verdict: कलम ३७० वैध की अवैध? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबईमध्ये जे ५५ उड्डाणपूल बांधले होते त्यांचा खर्च वसूल होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. या उड्डाणपूलांसाठी १ हजार २५९ कोटी खर्च झाले होते. परंतु २०२६ पर्यंत रस्ते विकास महामंडळाला ३ हजार १७२ कोटी यातून प्राप्त होतील. म्हणजे ही टोलवसुली सुरुच राहणार आहे.

Toll Charges
AC Truck: ट्रकचालकांचा प्रवास होणार सुखकर; केबिनमध्ये एसी बसवणे बंधनकारक, कधी लागू होणार नियम?

यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. टोल बंद करण्यासाठी सरकार काय पावलं उचलतं ते बघावं लागेल. परंतु वसुली सुरुच असल्याची कबुली सरकारने दिलीय. ज्या टोल चालकांनी अतिरिक्त वसुली केली, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()