‘मोझॅक’या विषाणूजन्य रोगामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक अडचणीत

राज्यात सुमारे ५१ हजार हेक्टरवर टॉमेटोचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी तब्बल २४ हजार हेक्टर क्षेत्रावर ‘सीएमव्ही’चा हल्ला झाल्याचा अंदाज आहे.
Tomato
TomatoSakal
Updated on

पुणे - राज्यातील एकूण टोमॅटो क्षेत्रापैकी जवळपास निम्म्या क्षेत्रावरील टोमॅटोवर ‘कुकुंबर मोझॅक’ (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाने हल्ला केला असून, यामुळे मागील दोन वर्षात राज्यातील अर्धे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

राज्यातील शेतकरी गटाने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकार याबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.

राज्यात सुमारे ५१ हजार हेक्टरवर टॉमेटोचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी तब्बल २४ हजार हेक्टर क्षेत्रावर ‘सीएमव्ही’चा हल्ला झाल्याचा अंदाज आहे. राज्यात २०२० च्या नोव्हेंबर महिन्यापासून हा विषाणू मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. याबद्दल बंगळूर येथील वनस्पती विषाणुशास्त्रज्ञ डॉ. एम. कृष्णा रेड्डी म्हणतात, ‘‘महाराष्ट्रात टोमॅटोच्या पट्ट्यामध्ये ‘कुकूंबर मोझॅक’ची तीव्रता वाढत आहे. सरकारने तत्काळ यावर उपाययोजना करून शेतकऱ्याना या संकटातून बाहेर काढावे. त्यासोबत टॉमेटो या पिकाला विमा मिळवून द्यायला हवा.’’ या रोगामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्य सरकारने टोमॅटो पिकाचा कीड रोग सर्वेक्षण योजनेमध्ये समाविष्ट केला होता. परंतु सध्या ती योजना कागदावरच असल्याचे दिसून आले. मागील दीड वर्षात कोणताही नुकसानीचा अहवाल तयार केलेला नाही आणि कोणतेही सर्वेक्षणसुद्धा झाले नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

Tomato
कलाकारांसाठी कोविड दिलासा पॅकेज मिळणार; मुख्यमंत्र्यांची मान्यता

शेतकरी गटाच्या सूचना

- राज्यातील प्रमुख बियाणे उत्पादक कंपन्यांनी प्रितिकारक्षम बियांनांवर संशोधन करावे

- प्रतिकारक्षम वाण तयार झाला, तरच शेतकऱ्यांना उन्हाळी लागवडीसाठी प्रवृत्त करावे

- कृषी विभागाच्या टोमॅटोसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी

- टोमॅटोला हवामानावर आधारित आपत्ती व्यवस्थापन पीक विमा योजनेत समाविष्ट करावे

राज्यातील टोमॅटो उत्पादन (फलोत्पादन विभाग २०२० च्या आकडेवारीनुसार)

  • ५१,७१७ हेक्टर - राज्यातील लागवडीखालील क्षेत्र

  • २४ हजार हेक्टर - क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज (शेतकरी गटाच्या सर्व्हेक्षणानुसार)

  • ८.७६ लाख मेट्रिक टन - मिळणारे उत्पादन

रोगाचे स्वरूप

  • कुकुंबर मोझॅक रोगाचा प्रसार हवेतील माव्याद्वारे होतो

  • टोमॅटो पिवळा पडणे, आकार वेडावाकडा होणे, तपकिरी लालसर चट्टे दिसणे

राज्यातील बाधित क्षेत्र

नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा,औरंगाबाद, लातूर आणि नागपूर विभाग

शासनाने या व्हायरसची गंभीर दखल घेतली आहे. पुढील दहा दिवसांत कृषी विभाग व संशोधक यांचा अहवाल मागवण्यात येईल. त्यानुसार आवश्यक निर्णय घेण्यात येईल.

- दादा भुसे, कृषी मंत्री, महाराष्ट्र

या विषाणूला प्रतिकारक्षम वाण विकसित करणे गरजेचे आहे. टोमॅटो पिकाचा पीक विम्यात समावेश करावा ही प्रत्येक सामान्य शेतकऱ्याची मागणी आहे. जर असे झाले नाही. तर राज्यातील दीड लाख एकर टोमॅटोचे क्षेत्र नष्ट होईल.

- अजित कोरडे, शेतकरी गटाचे सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.