NCP Crisis: उद्या शरद पवार, अजित पवार माढ्यात; राजकीय वेळ साधणार कोण! दोन्ही गटापुढे गर्दी जमविण्याचे आव्हान

तालुक्यातील राजकीय क्षितीजावर काका-पुतण्याचा राजकीय सीमोल्लंघनाचा व आपापल्या गटांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू आहे
Esakal
EsakalEsakal
Updated on

तालुक्यातील राजकीय क्षितीजावर काका-पुतण्याचा राजकीय सीमोल्लंघनाचा व आपापल्या गटांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या सोमवारी (ता.२३) माढा तालुक्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार येत असून, दोन्ही कार्यक्रमाची वेळ ही सकाळी दहाचीच आहे. त्यामुळे घडळयातील काट्यातील नेमकी ही एकच वेळ कोणत्या राजकीय घडामोडींची साक्षीदार ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात पवार काका-पुतण्यांचे दसऱ्याच्या एक दिवस आधीच राजकीय सीमोल्लंघन होणार आहे. (कै.) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ सोमवारी (ता.२३) सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते असून, नितीन कापसे यांच्या कृषीनिष्ठ परिवाराने कापसेवाडी (ता. माढा) येथे द्राक्षबाग शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा सोमवारी (ता.२३) सकाळी दहा वाजता खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अर्थात नितीन कापसे यांनी या मेळाव्यामागे राजकीय भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र राजकारणातील ताज्या घडामोडी पाहता दोन दिग्गज नेते एकाच दिवशी व एकाचवेळी कार्यक्रमाला माढा विधानसभा मतदारसंघात उपस्थित राहत असल्याने राजकीय चर्चा तर रंगणारच आहे.

Esakal
Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उतरणार लोकसभेच्या आखाड्यात; कोणत्या पक्षानं दिली उमेदवारी?

एक डाव दोन सूर; आपापले गडी कोंडीत

अजित पवार गटाचे‌ पदाधिकारी अर्थात आमदार बबनराव शिंदे व‌ आमदार संजय शिंदे यांच्या समर्थकांना गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणे क्रमप्राप्त आहे तर शरद पवारांवर निष्ठा असलेले कार्यकर्ते कापसेवाडीत उपस्थित राहणार. यामुळे राजकीय पटलावर एका डावात सुरपट्याच्या खेळातील एका ऐवजी दोन सूर एकदमच दिले असून, आपापले गडी कोंडीत ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

Esakal
Israel-Hamas War: भारतात 'या' मुद्द्यांवर कधीही युद्ध झालं नाही, कारण आम्ही 'हिंदू'; मोहन भागवतांचे विधान

राजकीय फाट्या स्पष्ट होणार

आमदार शिंदें बंधुंचा जनाधार बघता शरद पवारांना या मतदारसंघात शिरकाव करणे व आपला गट अधिक मजबूत करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. सध्या माढ्यात माजी आमदार भाई एस एम. पाटील यांचे चिरंजीव अॅड. बाळासाहेब पाटील व करमाळयात संजय पाटील-घाटणेकर यांना सोबत घेऊन शरद पवारांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.

त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यानंतर पंधरा दिवसांतच शरद पवार यांचा दौरा होत आहे. मात्र एकाच दिवशी शरद पवार व अजित पवार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी राजकीय फाट्या स्पष्ट होणार आहेत.

Esakal
ShivSena: शिवसेना पक्ष, चिन्ह ठाकरेंना परत मिळणार का?, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिवाळीनंतर सुनावणी

गर्दी जमविण्याचे आव्हान

दोन्ही कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी दोन्ही बाजूंचे स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. माढा मतदारसंघात गावोगावी राजकीय चर्चेला उधाण आले असून, गावातील पुढाऱ्यांना आपल्याच नेत्यांच्या मेळाव्याला जास्त लोक नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एक मात्र नक्की की मतदारसंघात मोठ्या पवार साहेबांचे राजकीय वजन जास्त आहे की दोन दादांचे वजन जास्त आहे हे पाहण्यासाठी जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.