पुणे - राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे विभागीय सहसंचालक किरणकुमार बोंदर यांचा समावेश असून, उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील डॉ.हरिभाऊ शिंदे यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे.
बंदल्यांच्या संदर्भातील अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. बोंदर यांची बदली नांदेड विभागीय सहसंचालक पदी करण्यात आली आहे. तर पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदी सध्याचे मुंबई विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांची बदली करण्यात आली आहे.
सोलापूरचे सहसंचालक डॉ.उमेश काकडे यांची बदली अमरावती विभागाच्या सहसंचालक पदी करण्यात आली आहे. तर अमरावतीच्या विभागीय सहसंचालक डॉ.नलिनी टेंभेकर यांच्याकडे सोलापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.
जळगाव येथील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण यांना नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात पाठविण्यात आले आहे. तर नागपूर येथे कार्यरत असणारे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.संजय ठाकरे यांच्याकडे जळगाव सहसंचालक पदाची जबाबदारी दिली आहे.
मुंबई येथील एलफिस्टन महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.संजय जगताप यांच्याकडे कोकण विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. तर उच्च शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ.हरिभाऊ शिंदे यांच्याकडे मुंबई विभागाचा अतिरिक्त सहसंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
शिंदे यांच्याकडे देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत चालू राहणार असल्याचे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. नांदेड विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.रामकृष्ण धायगुडे यांचा कार्यभार संपुष्टात आणला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.