Trimbkeshwar Temple Row: वादाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिराबाहेर लागला नवा फलक!

तीन दिवसांपूर्वी घटलेल्या घटनेच्या चौकशीसाठी सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे.
Trimbkeshwar Temple row
Trimbkeshwar Temple row
Updated on

नाशिकचं त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला आहे. लोकांना शनिवारी रात्री मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी बराच गोंधळ सुरु आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर आता मंदिराच्या प्रवेशद्वारावर नवा फलक लावण्यात आला आहे. (Trimbakeshwar Temple Row new board panted outside temple)

Trimbkeshwar Temple row
DK ShivKumar: शिवकुमार यांना दिलासा! CBIच्या याचिकेवरील सुनावणी SCनं ढकलली पुढे

'हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे' असं या नव्या फलकात म्हटल आहे. जुना फलक अस्पष्ट झाल्यानं हा नवा फलक लावण्यात अल्याचं सांगितलं जात आहे. मराठीसह इंग्रजी भाषेत हा फलक लावण्यात आला आहे. जुना बोर्ड हा भिंतीवर पेंट करण्यात आला होता. यामध्ये मराठीसह गुजराती आणि इंग्रजी भाषेत सूचना लिहिण्यात आली होती.

Trimbkeshwar Temple row
Jamie McDonald: पठ्ठ्यानं जॅकी चेनलाही टाकलं मागे! सात दिवसांत पाहिली जगातील 7 आश्चर्ये

दरम्यान, त्र्यंबकेश्‍वरमध्ये धार्मिक वातावरणासोबत सर्वधर्मीयांमध्ये सलोख्याचे नातं आहे. एकमेकांच्या कार्यात सहभागी होण्याची इथं परंपरा आहे. सर्वांनी आपल्या परीनं सलोखा अबाधित राखावा, असं शांतता समितीच्या सदस्यांनी सांगितलं आहे. तसेच पाच आळीत कार्यक्रम असतो, या कार्यक्रमात निघणारी मिरवणूक मंदिरापुढे आल्यावर धूप दाखवली जाते. ही नवी प्रथा अथवा वेगळेपणा नाही, आम्ही सर्व देवतांना मानतो असं स्पष्टीकरणही समितीकडून देण्यात आलं आहे.

Trimbkeshwar Temple row
Sharad Pawar: सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार घेणार महत्वाची भूमिका; मुंबईत बैठक सुरु

मुळातच, मिरवणूक काढणारे प्रसाद विकतात. धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या वस्त्रांची विक्री करतात. सगळ्या समाज आणि धर्मीयांचे इथं सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळं वेगळं काही घडलं असल्याचं वाटत असल्यास माफी मागतो, असंही समितीनं म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.