बच्चू कडू, आता नका रडू, अन्यथा हाती येतील मोतीचूर लाडू; तृप्ती देसाईंचा टोला

Trupti Desai and Bacchu Kadu
Trupti Desai and Bacchu Kadu
Updated on

मुंबई - जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं, असं विधान मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज असल्याची कबुली दिली. यावरून आता भूमाती ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी कडू यांना खोचक टोला लगावला. (Trupti Desai and Bacchu Kadu News in Marathi)

Trupti Desai and Bacchu Kadu
Bacchu Kadu : राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो; बच्चू कडूंचा कोणाला इशारा

तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून चारोळी करून बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. देसाई म्हणाल्या की, बच्चू कडू ,आता नका रडू. आता शिंदेंना नका नडू. म्हणाल मंत्रीपदासाठी लढू, वाट पहा शांततेने थोडी. अन्यथा हातात फक्त पडेल मोतीचूर लाडू.

मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर, 50 वर्षांच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. मी ही 20 वर्षांपूर्वी बंड (शिवसेना) केलं होतं. जर माझ्याकडून बंड झालं नसतं तर, बच्चू कडू राहिला नसता, कोणत्या निवडणुकीत निवडून आला नसता. त्यामुळं राजकारणात 'जो जिता वहीं सिंकदर' हा नियम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू मंत्री होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत स्थान मिळाल नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. हाच धागा पकडून तृप्ती देसाई यांनी कडू यांना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.