समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना! दोन मार्गिकेच्या मध्ये ट्रक पडून पेटला; चालकासह क्लीनरचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना! दोन मार्गिकेच्या मध्ये ट्रक पडून पेटला; चालकासह क्लीनरचा होरपळून मृत्यू
Updated on

कारंजा: समृद्धी महामार्गावरील लोकेशन १७८ जवळ दोन मार्गिकेच्या पुलाच्या मधोमधे ट्रक कोसळून ट्रकने पेट घेतला.

या अपघातात ट्रकचालक व क्लीनरचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता.१९ रात्री घडली आहे. सदर ट्रक पश्चिम बंगाल येथील असून मृतकांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.

अपघातग्रस्त ट्रक संभाजीनगर वरून पश्चिम बंगाल कडे निघाला होता. सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास हा ट्रक समृद्धी महामार्गावरील १७८ लोकेशन नजिक पोहोचला. या ठिकाणी ट्रक समृद्धी मार्गाच्या मधोमध असलेल्या पुलाचे कठडे तोडून आत पडला.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना! दोन मार्गिकेच्या मध्ये ट्रक पडून पेटला; चालकासह क्लीनरचा होरपळून मृत्यू
Yavatmal News: अंधश्रद्धेची परिसीमा! पोटाचा त्रास होत असल्याने नवजात शिशूच्या पोटावर बिब्याचे चटके

पडताना पुलाच्या कठड्याला घासल्यामुळे उडालेल्या ठिणगीमुळे डिझेलची टाकीला आग लागली व त्यात टाकी फुटून ट्रकने भीषण पेट घेतला. चालकाला डुलकी आल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रकचा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन नगरपरिषद, अग्निशामक दल व कारंजा शहर पोलिस स्टेशनला याची माहिती दिली.

शहर पोलिस स्टेशन कारंजा व अग्निशामक दल कारंजा हे घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

आग एवढी भयंकर होती की ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला व त्यामध्ये असलेले चालक व क्लीनर हेही जळून जागीच ठार झाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तास लागले.

अपघात एवढा भीषण होता की ट्रकने पेट घेतल्यानंतर आगीचा धूर दहा किलोमीटरवर दिसत होता. यावेळी कारंजा शहर पोलिस ठाण्यातील एपीआय पवार, पीएसआय रेगिवाले, पोलिस कॉन्स्टेबल जावेद मिनीवाले, पवन जाधव.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना! दोन मार्गिकेच्या मध्ये ट्रक पडून पेटला; चालकासह क्लीनरचा होरपळून मृत्यू
Yavatmal News: पोटाचा त्रास होत असल्याने नवजात शिशूच्या पोटाला बिब्याचे तेल लावल्याने प्रकृती चिंताजनक

प्रतीक राऊत, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे संजय बुटे, भूषण अवताडे, बाळकृष्ण सावंत, कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी बाथम, चालक चंदू कटारे, कृष्णा कोकाटे, संकेत अघमे व समृद्धी लोकेशन १०८ चे पायलट विधाता चव्हाण.

डॉक्टर सोहेल खान श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा आस-अपातकालीनचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. या अपघातील मृतक हे पश्चिम बंगाल येथील असल्याची माहीती आहे. मात्र वृत्त लिहिस्तोवर त्यांची नावे कळू शकली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.