मुंबई - बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भाजपच्या विजयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. (Sushma Andhare news in Marathi)
सुषमा अंधारे म्हणाल्या की, गुजरातच्या जनतेला महाराष्ट्रातून एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. भले ते कसेही कुट कारस्थान करून का होईना. महाराष्ट्रातील उद्योग जर गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. मी ही आठवण करून दिली पाहिजे की क्रिकेटर रवींद्र जडेजा यांनी ट्विटरवर जो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर केला होता. तो या गोष्टीचा द्योतक आहे की आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचा व्हिडिओ वापरावा लागतो. त्यांच नाव वापरावा लागतं यातच, आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे, आणि यातच भाजपाची हार सुद्धा आहे, असंही अंधारे यांनी नमूद केलं.
हेही वाचा- Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
संजय राऊत यांनी चिथावणी खोर वक्तव्य करू नये असं, बावनकुळे यांनी म्हटलं. त्यावर अंधारे म्हणाल्या, बावनकुळे यांनी असं नाही म्हटलं तर त्यांच प्रदेशाध्यक्ष पद जाऊ सुद्धा शकत. यावरून हे सिद्ध होते की भाजपा सुडाचं राजकारण करत आहे. तुम्ही काहीही बोललात की आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो. जसे कल्याणमध्ये अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. या पद्धतीचे राजकारण ते करू शकतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं आम्हाला फार काही वाटत नाही. आम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या.
महाप्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आहे अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यावर अंधारे म्हणाल्या काय कमाल आहे महाप्रबोधन यात्रा ही आम्ही सुरू केलेली. आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. शिंदे गटाची अडचण अशी आहे की त्यांनी प्रचंड पैसा पेरला, प्रचंड माणसं फोडली. पण एवढी सगळी माणसं फोडून सुद्धा अजेंड्यावर काम करायला माणूस नाही. म्हणजे सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा अशी गत त्यांची झाली आहे. आता त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करणारा एकही माणूस नसेल तर त्यात आमचा दोष काय. तुम्ही कुटुंब फोडली, पक्ष फोडले, माणसं फोडली. पैशांवर माणसे विकत घेता येऊ शकतात बुद्धी आणि निष्ठा विकत घेता येत नाही. भलेही आमच्याकडे सैन्यबळ कमी असेल पण आमची निष्ठा आणि आमची जिद्द हे निश्चितपणे मिंधे गटाला हैराण करून सोडणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.