मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा एक्झिट पोल्स आणि तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा अगदीच अनपेक्षित लागला आहे. निकालानंतर एकूणच कोणी किती जागा गमावल्या त्या मागं काय कारणं होती? याची विश्लेषणं समोर येत आहेत. त्याचबरोबर मतांची तुलना केल्यास अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
त्यानुसार, ट्रम्पेट किंवा पिपाणी या चिन्हावर उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवारांमुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तब्बल ९ उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. नेमकी कोणाला किती मतं मिळाली जाणून घेऊयात.