Trupti Deorukhkar: तृप्ती देवरुखकर शिवतीर्थावर...शर्मिला ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?

मराठी असल्याने मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना ऑफिससाठी जागा नाकारल्याचा मुद्दा चांगलाच पेटला
Trupti Deorukhkar
Trupti DeorukhkarEsakal
Updated on

मराठी असल्याने मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना ऑफिससाठी जागा नाकारल्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर याबद्दल संतप्त पोस्ट केली असून त्यांनी हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित असा इशारा दिला आहे. तर तृप्ती देवरुखकर यांनी आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. (Latest Marathi News)

शर्मिला ठाकरे यांच्या भेटीनंतर तृप्ती देवरुखकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घटना काय घडली याबाबत माहिती दिली आहे. मुलुंडमध्ये जो प्रकार घडला त्यानंतर मी कोणाला मदत मागण्यासाठी गेले नाही, मी रागाच्या भरात तो व्हिडीओ बनवला होता. कारण मला माझ्या भावना इतरांपर्यंत पोहचवायच्या होत्या. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर सर्वांत प्रथम मला मनसेने मदत केली. त्यांनी माझ्यासोबत येत त्या बाप-लेकांशी चर्चा केली. (Marathi Tajya Batmya)

मला ऑफिससाठी नाकारलं त्यांच्याकडून मराठीमधून माफी हवी होती. ती त्यांनी मनसे नेते पदाधिकारी सोबत आल्यानंतर मागितली, असं तृप्ती देवरुखकर यांनी सांगितलं.

Trupti Deorukhkar
Raj Thackeray : "...तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!"; राज ठाकरेंची मुलुंड येथील घटनेवर संतप्त प्रतिक्रिया

शर्मिला ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीत काय घडलं?

तृप्ती देवरुखकर पुढे बोलताना म्हणाल्या, शर्मिला ठाकरे यांनी भेटायला वेळ दिली. मलाही त्यांचे आभार मानायचे होते. कारण मनसैनिक आमच्या मदतीसाठी आले. त्यानंतर बाकीचे पक्ष आले. शर्मिला ठाकरे यांनी माझं आभिनंदन केलं. धाडस दाखवत पुढे आलीस चांगली गोष्ट आहे, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या असल्याचं तृप्ती देवरुखकर यांनी सांगितलं आहे.

Trupti Deorukhkar
Supriya Sule: कांदा प्रश्ना विषयी सरकार असंवेदनशील ; सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका !

काय आहे प्रकरण?

मुलुंड पश्चिममधील एका सोसायटीत महाराष्ट्रीयन असल्याने जागा नाकारण्यात आल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या घटनेविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. सदर महिला मुलुंडमधील एका सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहण्यासाठी गेली असता महाराष्ट्रातील व्यक्ती असल्याने एका गुजराती व्यक्तीने जागा नाकारली होती. यासंदर्भात तृप्ती देवरुखकर या महिलेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Trupti Deorukhkar
MLA Disqaulification : निकाल उशिरा लावण्यासाठी अध्यक्ष 'घाना'ला जाताहेत; ठाकरे गटाची टीका

राज ठाकरे काय म्हणालेत?

"मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला."

"हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.

काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे."

"अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!" असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

Trupti Deorukhkar
Crime News: आईने मुलासोबत मिळून पोटच्या लेकीला जिवंत जाळलं; धक्कादायक कारण आलं समोर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.