मुंबई : वारंवार बदल्यांमुळं आणि आपल्या कठोर निर्णयांमुळं कायम चर्चेत असलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. त्यांच्यासह इतर २० अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत, शिंदे-फडणवीस सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. (Tukaram Mundhe and other 19 officers transfered by Maha Govt)
शुक्रवार २ जानेवारी २०२३ रोजी या बदल्यांचा शासन आदेश काढण्यात आला असून यामध्ये सामान्य प्रशासन विभाग ते साखर आयुक्तांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या शासन आदेशानुसार, तुकाराम मुढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
गेल्या १६ वर्षात त्यांची २० वेळा त्यांची बदली झाली आहे. सध्या त्यांच्याकडं कृषी व पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. महिन्याभरापूर्वीच त्यांची या विभागात बदली करण्यात आली होती. (Marathi Tajya Batmya)
कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या?
तुकाराम मुंढे - सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय
चंद्रकांत पुलकुंडवार- साखर आयुक्त, पुणे
डॉ. सुधाकर शिंदे - अतिरिक्त महापालिका आयुक्त (BMC) मुंबई
सुजाता सौनिक - अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग
लोकेश चंद्र - अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM
एस वी आर श्रीनिवास - विशेष कर्तव्य अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प
राधिका रस्तोगी - मुख्य सचिव आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय
संजीव जयस्वाल - उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा
आय ए कुंदन - मुख्य सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय
आशीष शर्मा - प्रधान सचिव (2), नगरविकास विभाग, मंत्रालय
विजय सिंघल - महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई
अंशु सिन्हा - सचिव, OBS बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय
अनुप यादव - सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय
डॉ. अमित सैनी - मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन
डॉ. माणिक गुरसाल - मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड
कादंबरी बलकवडे - महासंचालक, MEDA, पुणे
प्रदीपकुमार डांगे - संचालक, रेशीम उद्योग, नागपूर
शंतनू गोयल - सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई
पृथ्वीराज बी. पी. - संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई
डॉ. हेमंत वसेकर - आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.